Goa Education : राख्यांच्या विक्रीतून कातकरी मुलांना मिळाला मदतीचा हात

चार शाळांकडून वानरमाऱ्यांच्या मुलांना मदत; सर्वसामान्यांकडून कौतुक
Student in Goa
Student in GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Education : निरंकाल-फोंडा येथील ‘वानरमारे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कातकरी आदिवासी समाजाची मुले परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांची घरे म्हणजे माडाच्या झावळ्यांच्या झोपड्या. अशा झोपड्यांमध्ये मुलांचे शैक्षणिक साहित्य सुरक्षित ठेवणे कठीण होते. त्यामुळे त्यांना कपाटाची गरज होती. अशा कपाटांची गरज डिचोलीतील साळ पुनर्वसन, शिरगाव व मायणी- नावेली व तिसवाडीतील धुळापी-खोर्ली या चार सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भागवली. रविवारी निरंकाल येथे भेट देऊन ही कपाटे त्यांना देण्यात आली.

या चारही शाळांमध्ये नुकतेच रक्षा बंधनानिमित्त राखी बनवणे कार्यशाळा झाली. या राख्यांची प्रदर्शन व विक्रीही झाली. त्यातून मिळालेल्या पैशांतून वानरमारेंच्या मुलांना कपाट भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. या उपक्रमाला त्यांना साखळीतील ''संवेदन केंद्र'' संस्थेचे माधवी राणे आणि दशरथ मोरजकर यांचे सहकार्य लागले.

Student in Goa
Pink Rickshaw Goa : गोव्यात आठ लाभार्थ्यांना दिल्या पिंक रिक्षा

या भेटीवेळी या चारही विद्यालयांतील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी वानरमारे म्हणजेच कातकरी समाजाचे राहणीमान, आहार, त्यांचा कामधंदा, मुलांचे शिक्षण व आरोग्य आणि इतर समस्या जाणून घेतल्या. कातकरी समाजाला पक्की घरे मिळाली नसल्याने उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली.

राखी बांधून जोपासले मानवतेचे नाते

यावेळी चारही शाळांतील मुलींनी वानरमारेंच्या मुलांना राख्या बांधून त्यांच्यासोबत मानवतेचे नाते प्रस्थापित केले. तसेच वानरमारे समाजाच्या मुलींनी या शाळांतील मुलांना राख्या बांधल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Mahaaghadi Latest News
Bicholim Broiler Chicken Price Hike
Goa Bhandari Community Politics
Scheduled Tribes Of Goa Demand
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com