Mapusa Viral Video: म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालय (St Xavier's College Mapusa) नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. कधी विद्यार्थी मंडळ निवडीवरून तर कधी शिवजयंतीवरून महाविद्यालयातील बातम्या समोर येत असतात.
दरम्यान, आता झेवियर महाविद्यालयातून एक अशी घटना समोर आली आहे. ज्याची चर्चा सर्वत्र होत असून, त्यावरून उलट-सुलट प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत.
सेंट झेवियर महाविद्यालयात (St Xavier's College Mapusa) जय श्रीरामच्या गाण्यावर विद्यार्थ्यांचा डान्स करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी साहिल महाजन याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. साहिल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता देखील आहे.
"सेंट झेवियर महाविद्यालयात जय श्रीराम, माझा देश बदलत आहे." असे कॅप्शन साहिल महाजन याने या व्हिडिओ शेअर करताना दिले आहे.
मनीष नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने, मी गोव्यातील अनेक शाळांमध्ये जिथे हिंदू विद्यार्थी अधिक आहेत तिथे नाताळ उत्साहात साजरा केल्याचे पाहिले आहे. त्याठिकाणी काही समस्या नाही मग येथे काय समस्या आहे.? असे त्याने लिहले आहे.
"गोव्यात अनेक सण, उत्सव ख्रिस्ती आणि हिंदू बांधव एकत्रित आनंदात साजरे करतात. उदा. शिगमो, जागोर, गोवा कार्निव्हल इ... मागील अनेक वर्षांपासून असे होत आहे." असे ट्विट एका गोन्साल्विस नावाच्या अकाऊंटवरून करण्यात आले आहे.
मला कळत नाही विद्यार्थी महाविद्यालयात जय श्रीराम का म्हणत आहेत. महाविद्यालयात जिझस ख्राईस्ट किंवा इतर कोणत्याही धर्माच्या घोषणा देण्याएवढेच मूर्खपणाचे आहे.असे स्टीव डायस यांनी ट्विट केले आहे.
गोव्यात अनेक लोक हिंदू असून ते धार्मिक आहेत. गोव्याला डाव्या विचारसरणीचे राज्य कोणीही करू शकत नाही. असे एकाने ट्विट केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.