Sattari News: विद्यार्थी मंडळाची निवड ‘डमी ईव्हीएम’ यंत्राद्वारे; पहिलीच शाळा

सत्तरीतील शाळेत अभिनव उपक्रम, विद्यार्थ्यांनी घेतला मतदानाचा अनुभव
EVM
EVMDainik Gomantak
Published on
Updated on

अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क प्राप्त होतो. लोकशाहीने दिलेला हा अधिकार आहे. या अधिकाराबाबत बाल वयात जागृती घडवून आणली तर देशात सक्षम नागरिक निर्माण होतील.

यासाठी सत्तरीतील एका प्राथमिक शाळेने आपल्या विद्यार्थी मंडळाची निवडणूक पहिल्यांदाच "डमी ईव्हीएम" यंत्र वापरून घेण्यात आल्या.

सत्तरीतील बाहेरीवाला, केरी येथील सरकारी प्राथमिक विद्यालय हे "डमी ईव्हीएम" यंत्राचा वापर करून विद्यार्थी मंडळाची निवडणूक घेणारे राज्यातील पहिलेच विद्यालय ठरले आहे.

EVM
Curchorem News: हस्तक्षेप याचिका दाखल करणार; कुडचडे पालिकेचा निर्णय

विद्यार्थ्यांत मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी. तसेच मतदान हक्काबाबत माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. आजची मुले ही या देशाचे भावी नागरिक आहेत. त्यांना मतदानाचा हक्क, मतदान प्रक्रीया याबाबत वेळीच माहिती मिळाली तर ते सक्षम नागरिक घडतील, हा या मागचा उद्देश होता.

या मतदानाची तयारी विद्यार्थी व शिक्षकांनी आठ दिवस अगोदरपासून चालवली होती. त्यात उमेदवारी अर्ज भरणे, प्रचार करणे तसेच मतदान दिवशी निवडणूक कर्मचारी व केंद्राध्यक्ष आदींची नेमणूक केली होती.

या निवडणुकीत दहा विद्यार्थी उमेदवार होते. मतदान संयोजक व रिटर्निंग अधिकारी म्हणून शिक्षक प्रमोद सावंत यांनी काम पाहिले. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक संभाजीराव राणे यांनी काम पहिले. निवडणूक अधिकारी म्हणून शिक्षिका आकांशा गावस तसेच बालवाडी बाई प्रणाली गाड व मंजू फर्नांडिस यांचे सहकार्य केले.

EVM
Drushti: बुडणाऱ्या चौघा पर्यटकांना जीवरक्षकांकडून जीवदान

निवडलेले विद्यार्थी मंडळ

विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहून "डमी ईव्हीएम" यंत्राची कळ दाबून मतदान केले. मत मोजणीनंतर विघ्नेश घाडी मुख्यमंत्री, गोपाळ गावस उपमुख्यमंत्री, गीतीजा घाडी स्वच्छता मंत्री, निहारिका गावस सांस्कृतिक मंत्री, रुद्राक्ष बांदेकर क्रीडा मंत्री, श्रेयश गावस पर्यावरण मंत्री, नूपुर गाड सहल मंत्री यांची निवड झाली.

या उपक्रमाबाबत सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समितीतर्फे अभिनंदन करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com