Trees Collapses In Galgibaga: लाटांच्या तडाख्याने १२ झाडे उन्मळून पडली; गालजीबाग येथील घटना

Galgibaga: या किनाऱ्यावर २००९ साली जोरदार लाटांमुळे सुरूची सुमारे ५० झाडे उन्मळून पडली होती
Galgibaga: या किनाऱ्यावर २००९ साली जोरदार लाटांमुळे सुरूची सुमारे ५० झाडे उन्मळून पडली होती
Trees Collapsed At GalgibagaDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: पैंगीण पंचायत क्षेत्रातील सागरी कासवांसाठी आरक्षित असलेल्या गालजीबाग किनाऱ्यावर जोरदार लाटांच्या तडाख्याने सुरूची १२ झाडे उन्मळून पडली. यापूर्वी या किनाऱ्यावर २००९ साली जोरदार लाटांमुळे सुरूची सुमारे ५० झाडे उन्मळून पडली होती.

त्यानंतर तौक्ते वादळ झाले, तेव्हाही सुरूची झाडे उन्मळून पडून किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात झीज झाली होती. ही झीज अशीच सुरू राहिल्यास येथूनच जवळ असलेल्या गालजीबाग नदीकाठालगतच्या घरांना धोका संभवतो.

Galgibaga: या किनाऱ्यावर २००९ साली जोरदार लाटांमुळे सुरूची सुमारे ५० झाडे उन्मळून पडली होती
Galgibaga Beach : गालजीबाग किनारा कात टाकणार!

वस्तुत: या किनाऱ्यावर पर्यटन व्यवसायाला बंदी असताना अनधिकृतरित्या गालजीबाग नदी किनाऱ्यावर पर्यटन व्यवसाय सुरू आहे. यापूर्वी गालजीबाग नदीने प्रवाह बदलून किनारा फोडला होता. पैंगीण जैवविविधता समितीने ही बाब वेळोवेळी संबंधितांच्या नजरेस आणून दिली होती, असे जैवविविधता समितीचे अध्यक्ष सुभाष महाले यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com