Galgibaga Beach : गालजीबाग किनारा कात टाकणार!

अधिकाऱ्यांकडून पाहणी : पर्यटकांसाठी उपलब्ध होणार साधनसुविधा
Galgibaga Beach
Galgibaga BeachDainik Gomantak
Published on
Updated on

Galgibaga Beach :पर्यटन खाते व पर्यटन विकास विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी काणकोणातील समुद्र किनाऱ्यांचा विकास करण्याच्या दृष्टीने आज पाहणी केली. पाळोळे, पाटणे, आगोंद, गालजीबाग-तळपण व पोळे या किनाऱ्यांचा यात समावेश आहे.

पाळोळे किनारा सोडल्यास अन्य कोणत्याच किनाऱ्यावर वाहनतळ, प्रसाधनगृह, चेंजिंग रूम यासह इतर साधनसुविधांची सोय नाही, असे येथील स्थानिक नगरसेवक व पंच, सरपंचांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

पाळोळे किनाऱ्यावर हायमास्ट दिव्यांची गरज आहे. त्याचप्रमाणे वाहनतळ सुविधा वाढविण्याची गरज असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

या किनाऱ्यावर पर्यटकांना बसण्यासाठी बाक व अन्य काही सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या पाहणी पथकात पर्यटन खात्यासह पर्यटन विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता किरणकुमार नाईक, साहाय्यक अभियंता मदेरा, कनिष्ठ अभियंता आशिष कळंगुटकर, सल्लागार विश्वनाथ शेळी, संगीता मांद्रेकर यांचा समावेश होता. ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌

Galgibaga Beach
Goa Crime : अखेर मुसक्या आवळल्याच; चोराच्या नावावर चोरी, घरफोडीचे 48 गुन्हे!

कासवांचा अधिवास

गालजीबाग किनारा सागरी कासवांच्या अधिवासासाठी आरक्षित केलेला आहे. किनाऱ्यालगतची जमीन वन खात्याच्या ताब्यात आहे. वन खात्याशी पर्यटन खात्याने चर्चा करून काही जमीन हस्तांतरित करून घेण्याचा पर्याय पैंगीणचे उपसरपंच सुनील पैंगीणकर यांनी अधिकाऱ्यांना सुचवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com