Mapusa : म्हापशात चतुर्थीनंतर पदपथ-गटारांचे बांधकाम

सरकारची गोवा खंडपीठाला माहिती: पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी होणार
Mapusa News
Mapusa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa : म्हापसा शहरातील रस्त्यांवरील पदपथांचे तसेच गटारांचे काम टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. काही परिसरातील काम गणेशचतुर्थीनंतर सुरू करून पुढील ६ महिन्यात पूर्ण केले जाईल. रस्त्याच्या बाजूने जागेचा अंदाज घेऊन काही भागात पदपथाच्या कामाबाबत म्हापसा पालिका अजून निर्णय घ्यायची आहे. या शहरातील पदपथांबाबतचा स्थिती अहवाल सादर केला जाईल अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली.

त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कामाचा स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर 2022 रोजी ठेवली आहे.

म्हापसा शहरामध्ये रस्त्याच्या बाजूने पदपथ नसल्याने ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांना रस्‍त्यावरून चालत जावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका संभवू शकतो. त्यामुळे पदपथ बांधकाम करण्याचे निर्देश म्हापसा पालिकेला द्यावेत अशी विनंती करणारी जनहित याचिका गोवा फाऊंडेशनने 2020 साली दाखल केली होती. गोवा खंडपीठाने यासंदर्भात निर्देश देत पथपद बांधकाम करण्यासाठी पालिकेला निर्देश दिले होते व त्याचा आराखडा सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार शहरातील पदपथांचा आराखडा पालिकेने सादर करून टप्प्याटप्प्याने करण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली होती.

शहरातील विविध भागात पदपथ व गटारांचे बांधकामाबाबत म्हापसा पालिकेला कल्पना दिली जाईल, अशी माहिती पालिकेच्या वकिलांनी सांगितले.

Mapusa News
Goa Government : 'त्या' सहा उपनिबंधकांच्या उचलबांगडीचा आदेश

सहा महिन्याचा अवधी

पदपथ व गटाची बांधकामे सुरू करण्यासंदर्भातची निविदा आदेश देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूने जागा आहे, तेथे गटाराचे तसेच पदपथ बांधण्याचे काम सुरू केले जाईल. ते पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी लागेल. इतर भागातही काम सुरू केले जाईल. काही परिसरात रस्त्याच्या बाजूने असलेल्या कमी जागेसंदर्भात म्हापसा पालिकेला निर्णय घ्यावा लागेल मात्र तेथेही गटारे व पदपथ बांधकाम केले जाईल, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल पांगम यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com