Goa Government : 'त्या' सहा उपनिबंधकांच्या उचलबांगडीचा आदेश

जमीन हडप प्रकरणात अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
Colvale Land Scam
Colvale Land ScamDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government : राज्यातील जमीन हडपप्रकरणीच्या पार्श्‍वभूमीवर बार्देश तालुक्यातील तीन नागरी निबंधक तथा उपनिबंधकांसह (सीएससीआर 6 जणांच्या उचलबांगडीचा आदेश कायदा व न्यायसंस्था (स्थापन) विभागाने काढला आहे. बार्देश तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये जमीन हडपप्रकरणांची नोंदणी झाल्याने उपनिबंधकांची अदलाबदली करण्याची पावले उचलण्यात आली आहेत.

बार्देशच्या नागरी निबंधक तथा उपनिबंधक श्रद्धा एस. भोबे, संयुक्त नागरी निबंधक तथा उपनिबंधक उपनिबंधक मालिनी सावंत, संयुक्त नागरी निबंधक तथा उपनिबंधक प्राची नाईक यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे. दक्षिणेचे जिल्हा निबंधक व सालसेत उपनिंबधकाचा ताबा असलेल्या सूरज वेर्णेकर यांची जिल्हा निबंधकपदी (मुख्यालय) बदली करून बार्देश उपनिबंधकाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

जिल्हा निबंधक (मुख्यालय) व तिसवाडी उपनिबंधकाचा ताबा असलेले अर्जुन शेट्ये यांची दक्षिणेचे जिल्हा निबंधकपदी बदली करून सालसेत उपनिबंधकाचा अतिरिक्त ताबा तर पेडण्याचे उपनिबंधक महेश प्रभू पर्रीकर यांच्याकडे बार्देश संयुक्त उपनिबंधकाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

Colvale Land Scam
Goa BJP : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप दोन्ही जागा जिंकणार

राहुल देसाई यांची बदली नाही

जमीन हडपप्रकरणी बार्देशचे मामलेदार राहुल देसाई यांच्याविरुद्ध एसआयटीने दोन गुन्हे केल्यानंतरही त्यांची अजून बदली झालेली नाही. या प्रकरणात काही निबंधकही गुंतले असल्याची माहिती एसआयटी अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यानुसार कायदा खात्याने उपनिबंधकांच्या बदल्या केल्या आहेत; मात्र महसूल खात्याकडून मामलेदार देसाई यांची बदली करण्यात आली नसल्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

बार्देश तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमिनींचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे वरिष्ठ उपनिबंधक सूरज वेर्णेकर यांची नियुक्ती करून जी काही प्रकरणे प्रलंबित आहेत ती हातावेगळी करण्यास सांगण्यात आले आहे. अनेक वकील गैरप्रकारे विक्रीखत करण्यामध्ये गुंतलेले आहेत. अर्धवट माहितीच्या आधारे विक्रीखतसाठी अर्ज करण्यात येत आहेत. याप्रकरणी चौकशी केली जाईल, अशी माहिती मंत्री निलेश काब्राल यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com