Stray Dog Beach Attack
Stray Dog Beach Attack Dainik Gomantak

Stray Dogs: किनाऱ्यावर कुत्र्यांना खायला घालताय? पंचायत केळशी पंचायतीचे नियम कडक

Goa Beach: केळशी पंचायतीने येथील समुद्रकिनाऱ्यांवर श्वानांना खायला घालण्यास बंदी घातली आहे.
Published on

Goa Stray Dog Attack News

सासष्टी: गेल्या काही आठवड्यात केळशी व मोबोर समुद्रकिनाऱ्यांवर श्वानांचा उपद्रव वाढला असून आतापर्यंत जवळपास १४ लोकांना श्वानांनी चावा घेण्याच्या घटना घडल्या आहेत. याची गंभीर दखल घेत केळशी पंचायतीने येथील समुद्रकिनाऱ्यांवर श्वानांना खायला घालण्यास बंदी घातली आहे.

रविवारी (दि.१२ जानेवारी) सरपंच डिक्सन वाझ, स्थानिक पंच डिकॉस्ता आणि स्थानिकांनी मोबोर व केळशी समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका मारला व स्थितीचा आढावा घेतला. काही लोक व पर्यटक संध्याकाळच्या वेळी समुद्रकिनाऱ्यांवर कुत्र्यांना खायला घालतात.

Stray Dog Beach Attack
Stray Dogs Attack: गोव्यातील किनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांचा वाढला उच्छाद! तीन ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला; सलग घटनांमुळे चिंतेत भर

नियमित नसले तरी अधूनमधून हे प्रकार चालतात. त्यामुळे श्वानांना चटक लागली आहे. संध्याकाळच्या वेळी खायला मिळाले नाही तर ते आक्रमक होतात, असे स्थानिक पंच व वॉटर स्पर्ट्‌स चालविणारे डिकॉस्ता यांनी सांगितले. माजी पंच सोफिया सिल्वा मोंतेरो या सध्या केळशी पंचायतीच्या श्वान आश्रय घराची देखरेख करतात.

सरपंचांचे आवाहन

केळशी पंचायतीने यापूर्वीच श्वानांसाठी आश्रय घर सुविधा उपलब्ध केली आहे. किनाऱ्यांवरील भटक्या श्वानांना खायला घालण्यापेक्षा आश्रय घरांतील श्वानांना खायला घाला, असे आवाहन केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी लोकांना केले आहे. ज्या कुणाला श्वानांना खायला घालायचे असेल, त्यांनी पंचायतीकडे नोंदणी करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com