Stray Dogs: मडगावात भटक्या कुत्र्यांची दहशत! अनेकांना चावा घेण्याचे प्रकार, नागरिकांमध्ये भीती

Margao Stray Dogs: मडगाव परिसरात रस्त्याच्या कडेला व वाड्यावाड्यावर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. अनेक ठिकाणी ही भटकी कुत्री गटा-गटाने फिरताना दिसत आहेत.
Goa Stray Dogs
Dog Bite Cases In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Stray Dogs

फातोर्डा: मडगाव परिसरात रस्त्याच्या कडेला व वाड्यावाड्यावर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. अनेक ठिकाणी ही भटकी कुत्री गटा-गटाने फिरताना दिसत आहेत. या कुत्र्यांकडून अनेकांना चावा घेण्याचे प्रकार, रस्‍त्‍याच्‍या मध्ये धावून येऊन अपघाताला आमंत्रण देण्याचे प्रकार, कोणत्याही व्यक्तीवर धावून येण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशाने येथील नागरिकांमध्ये भीती पसरलेली आहे.

पॉवर हाऊस, आके, स्टेशन रोड परिसर, मालभाट, आझाद नगरी, मडगाव बाजार परिसर, कोंबवाडा, खारेबांद, हाऊसिंग बोर्ड व इतर

ठिकाणी एक व दोन नव्हे तर १० ते १२ च्या गटाने फिरताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी एक मोटरसायकलस्वार रस्त्यावरून आपले वाहन घेऊन जात असताना त्याच्यासमोर एक कुत्रा धावत आडवा आला. या वाहनचालकाचा त्या कुत्र्याला धक्का बसल्याने वाहनचालक खाली कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नंतर त्याला रुग्णवाहिकेने मडगाव जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते.

Goa Stray Dogs
Margao Market: दुकाने 500 रक्षक दोन! मडगाव मार्केटची व्यथा; सुरक्षेसाठी व्यापाऱ्यांचे पालिकेला निवेदन

 बालभवन आके येथेही दहा-बारा कुत्र्यांचा गट फिरत आहे. यातील काही कुत्र्यांनी दोघाजणांचा चावा घेण्याचा प्रकार घडला होता. या वाढत्या कुत्र्यांमुळे असले प्रकार दररोज घडत आहेत. काहीजण आपली पाळीव कुत्री मुख्य रस्त्यावर फिरायला घेऊन येतात. यावेळीही बाजूने जाणाऱ्या व्यक्तींवर ती धावून जातात. या वाढत्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांना फिरणे धोकादायक बनले आहे.

Goa Stray Dogs
Stray Dogs: 50 रुपयांत लोकं कुत्रे पकडतील असं तुम्हाला वाटतं का? निर्बिजीकरणाबाबत गोवा सरकार गंभीर नाही; LOP आलेमाव

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला तोंड देण्यासाठी सरकारने सोनसडो येथे बहुमजली शासकीय पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे काम सुरू केले होते; परंतु अडीच वर्षे उलटूनही त्याचे बांधकाम पूर्ण झाले नाही, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून नागरिकांना समाधान कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com