Goa Stray Dogs: रशियन पर्यटकावर सहा कुत्र्यांचा हल्ला, गोव्याच्या समुद्रकिनारी श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ

Stray Dogs on Goa Beach: राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावर दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी फेब्रुवारीपासून आतापर्यंत १०६ हून अधिक पर्यटकांचे प्राण वाचवले.
Stray Dogs
Stray Dogs Goa BeachDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावर दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी फेब्रुवारीपासून आतापर्यंत १०६ हून अधिक पर्यटकांचे प्राण वाचवले. ७ हरवलेली मुले पालकांच्या स्वाधीन केले. याशिवाय ५ चोरीचे प्रयत्न हाणून पाडले. तसेच श्वान चावल्याच्या ३ घटना आणि स्टिंगरेच्या दंशासंबंधी तातडीने प्रथमोपचार दिले आहेत.

सतत घडणाऱ्या या घटनांमुळे समुद्रकिनाऱ्यावर फिरणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दृष्टी मरीनचे जीवरक्षक सतत आपले कर्तव्य बजावत असले, तरी भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन आणि पर्यटकांची सुरक्षितता यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

समुद्रकिनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांत चिंताजनक वाढ होत आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक पर्यटकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या असून, यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे वाढते प्रकार लक्षात घेता, स्थानिक प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

पर्यटकांची सुरक्षा आणि किनाऱ्यांचा अनुभव आनंददायी ठेवण्यासाठी भटक्या कुत्र्यांसाठी विशेष मोहिमा राबविण्याची मागणी जोर धरत आहे.

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे किनाऱ्यावर फिरणाऱ्या पर्यटकांमध्ये भीती पसरली आहे. किनाऱ्यावर चालणे, फिरणे किंवा सूर्यस्नान करताना पर्यटकांना सतत सावध राहावे लागत आहे.

Stray Dogs
Goa Tourism: पर्यटकांची संख्या कमी! शॅकमालकांनी मांडली व्यथा, हंगाम संपण्यापूर्वीच अनेकांनी गुंडाळला गाशा

ब्रिटिश, रशियन पर्यटकांवर कुत्र्यांचा हल्ला

बाणवली समुद्र: एका ८० वर्षीय ब्रिटिश पर्यटकावर कुत्र्याने हल्ला केला. जीवनरक्षकांनी तातडीने जखम स्वच्छ करून प्रथमोपचार दिले.

बाणवली समुद्र (दुसरी घटना): एका रशियन पर्यटकावर सहा कुत्र्यांच्या टोळीने हल्ला करून चावा घेतला. जीवरक्षकांनी तातडीने तिच्या मदतीला धाव घेऊन तिला वैद्यकीय मदत मिळवून दिली.

Stray Dogs
Goa Tourism: गोव्यातील धार्मिक स्थळांवर वाहनांची गर्दी! पार्किंग समस्येने पर्यटक त्रस्त; वाहतूक कोंडीमुळे वाढता मनस्ताप

जीवरक्षकांची कामगिरी

दुहेरी बचावकार्य: ६ वेळा दुहेरी बचाव करण्यात आला, त्यात दोन-दोन पर्यटकांना एकाच वेळी वाचविण्यात आले.

एक बचावकार्य: १०० हून अधिक पर्यटकांना जीवदान.

हरवलेली मुले: ७ हरवलेली मुले पालकांना सुपूर्त.

मदत: १५ हून अधिक पर्यटकांना जखमी अवस्थेत मदत.

चोरीचे प्रयत्न: ५ चोरीचे प्रयत्न हाणून पाडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com