Ponda STP: स्वच्छ सुंदर फोंड्यासाठी ‘एसटीपी...!’

चांगला प्रतिसाद ः ढवळी-कवळे येथील 15 एमएलडी प्रकल्पाचे उद्‍घाटन; जोडणी खुली
Ponda STP
Ponda STPDainik Gomantak

Ponda STP स्वच्छ सुंदर आणि हरित फोंडा तालुक्यासाठी मलनिस्सारण अर्थातच एसटीपी प्रकल्पाशिवाय पर्याय नाही, हे नागरिकांच्या बेपर्वा वृत्तीनेच दाखवून दिले आहे. अंत्रुज महालातील सगळेच नाले जर आपण पाहिले तर कचराकुंडी ठरले आहेत.

टाकाऊ म्हणून जे काही असेल ते सरळ नाल्यात फेकून देण्याच्या कृतीमुळे आणि घरातील सांडपाणी तसेच संडासाचे मलमूत्र नाल्यात सोडण्याच्या प्रकारामुळे एकेकाळी स्वच्छ पाण्याचे वाहते झरे असलेले अंत्रुज महालातील हे ओहळ नंतरच्या काळात नाले बनले आणि आता तर या नाल्यांची स्थिती दयनीय बनली आहे, त्यामुळेच तर आता मलनिस्सारण अर्थातच एसटीपी प्रकल्पांची जाणीव प्रकर्षाने व्हायला लागली आहे.

गेल्या आठवड्यात फोंडा मतदारसंघातील पालिका क्षेत्र तसेच मडकई मतदारसंघातील ढवळी, कवळे व इतर भागातील लोकांसाठी एसटीपी प्रकल्प जोडणीला प्रारंभ करण्यात आला आहे. ढवळी-कवळे येथील साधारण पंधरा एमएलडी एसटीपी प्रकल्पाचे उद्‍घाटन झाल्यानंतर ही जोडणी खुली करण्यात आली असून या जोडणीला तसा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे या खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपले घर तेवढे स्वच्छ राहील अशी मानसिकता बाळगलेल्या लोकांच्या दुष्ट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी अशाप्रकारचे एसटीपी प्रकल्प प्रत्येक ठिकाणी व्हायला हवेत, असे या खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी कवळेतील एसटीपी प्रकल्प उद्‍घाटनावेळी सांगितले होते.

पुढील काळात एसटीपी प्रकल्पाची जोडणी प्रत्येक घरासाठी अनिवार्य ठरणार असल्याचेही सुतोवाच काब्राल यांनी केल्याने बेपर्वा वृत्तीला बऱ्याच अंशी लगाम बसेल हे नक्की.

Ponda STP
Goa Fire: म्हादईचे वन वाचविण्यासाठी माणुसकीचे हात एकवटले!

सुमारे 400 कोटींचे नियोजन

अंत्रुज महालातील एसटीपी प्रकल्पासाठी सुमारे 400 कोटींचे नियोजन करण्यात आले. हा आकडा वाढतच जाणार हे नक्की असल्याने त्यादृष्टीने केंद्र सरकारच्या योजनेतून हा प्रकल्प साकारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मात्र, एसटीपी महामंडळाची दिरंगाई, संबंधित कंत्राटदाराची बेपर्वा वृत्ती आणि काम पूर्ण करण्यातील अक्षम्य हेळसांड यामुळेच हा प्रकल्प रखडला गेला. मात्र, नंतरच्या काळात या कामाला गती दिल्यामुळे फोंड्यातील बहुतांश काम पूर्ण झाले आहे.

Ponda STP
Goa Shigmotsav: डिचोली चित्ररथ स्पर्धेत बांदोड्याची महालक्ष्मी नागरिक समिती प्रथम

एसटीपी जोडणी घेण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. आपला गाव, आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अशा तऱ्हेचा प्रकल्प साकारला जातो, त्यावेळेला नागरिकांनीही या चांगल्या कार्यासाठी सहकार्य करायला हवे.

- सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

स्वच्छ सुंदर फोंड्याची संकल्पना साकारण्यासाठी एसटीपी प्रकल्पाची कार्यान्विती अनिवार्य ठरली आहे. फोंडा शहर आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी एसटीपीची जोडणी घेणे आवश्‍यक असून त्यादृष्टीने नागरिकांकडून मिळणारे सहकार्य उल्लेखनीय असेच आहे.

- रवी नाईक, कृषीमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com