

वाळपई: सत्तरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच असून जनजीवनावर त्याचा परिणाम होत आहे. तसेच वीजवाहिन्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
बुधवारी (ता.८) सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. रस्ते, वीजवाहिन्या आणि सार्वजनिक ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक तसेच वीजपुरवठा काही काळ विस्कळीत झाला.
सर्व ठिकाणची झाडे हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. या सर्व घटनांमध्ये वीजवाहिन्यांचे आणि काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. वाळपई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे हटविण्याचे काम हाती घेतले. त्याचबरोबर वीज विभागाचे कर्मचारीही वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत होते.
यावेळी अग्निशन दलाचे अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ताराम देसाई, अशोक नाईक, उमेश गावकर, ज्ञानेश्वर सावंत, पी.गावकर व रामा नाईक यांनी मदतकार्य केले. दरम्यान, एकूण किती नुकसान झाले आहे, याची माहिती मिळू शकली नाही.
विविध प्रकारच्या झाडांमुळे नुकसान
खडकी येथील श्रीराम मंदिराजवळ आंब्याचे झाड रस्त्यावर पडले.
केरी येथील मोर्शी पुलाजवळ काजूचे झाड रस्त्यावर पडले.
ब्रह्माकरमळी बसथांब्याजवळ सुकलेले झाड रस्त्यावर पडले.
पाडेली बसथांब्याजवळ फणसाचे झाड रस्ता व वीजवाहिनीवर पडले.
रावण कॉलनी येथे सातेरी मंदिराजवळ गुलमोहराचे झाड रस्ता व वीजवाहिनीवर पडले.
वाळपई नगरपालिका उद्यानात गुलमोहराची मोठी फांदी तुटून लोंबकळत होती.
वाळपई अग्निशमन केंद्रासमोरील वन प्रशिक्षण केंद्राच्या आवारात झाड पडले.
तार-सावर्डे परिसरात आकेशिया जातीचे झाड वीजवाहिनीवर पडले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.