Zarwada Vagator Water Mismanagement
Zarwada Vagator Water MismanagementDainik Gomantak

Vagator: 'सगळे पाणी हॉटेल्सना जातेय, आम्हाला काय'? वागातोर ग्रामस्थांची ‘पेयजल’च्या कार्यालयावर धडक; गैरव्यवस्थापन थांबवण्याची मागणी

Vagator Water Problem: मोर्चेकरांनी अभियंत्यांच्या निर्दशनास आणून दिले की, झरवाडा येथील अनियमित व अपुऱ्या पाणीपुरवठ्याचे मुख्य कारण हे जलवाहिनीचे गैरव्यवस्थापन आहे.
Published on

म्हापसा: मागील पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून झरवाडा, वागातोर येथे भेडसावणाऱ्या अनियमित व अपुरा पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता.१९) म्हापसा येथील पेयजल खात्याच्या कार्यालयावर धडक दिली. मोर्चेकरांनी अभियंत्यांना निवेदन सादर करून स्थानिकांची होणारी हेळसांड दूर करण्याची मागणी केली.

मोर्चेकरांनी अभियंत्यांच्या निर्दशनास आणून दिले की, झरवाडा येथील अनियमित व अपुऱ्या पाणीपुरवठ्याचे मुख्य कारण हे जलवाहिनीचे गैरव्यवस्थापन आहे. कारण जलवाहिनी कथितपणे व्यावसायिक व्हिला व हॉटेल्सकडे अप्रमाणितपणे वळवल्या आहेत.

परिणामी, स्थानिक कुटुंबांना कमी दाब किंवा अपुऱ्या पाण्याचा सामना करावा लागतो. तसेच मर्यादेपेक्षा जास्त आकाराची जलवाहिनी कनेक्शन व्यावसायिक आस्थापनांसाठी बसवल्या आहेत. ज्यामुळे सामान्य रहिवाशांवर गंभीर अन्याय होत आहे, असे मोर्चेकरांनी सांगितले.

Zarwada Vagator Water Mismanagement
Water Metro Goa: 'वॉटर मेट्रो'साठी पथक गोव्यात दाखल! करणार जलमार्गांचा अभ्यास; मांडवीच्या पात्राची तपासणी

मोर्चेकरांनी मागणी केली की, पेयजल विभागाने समतोल पाणी वितरण सुनिश्चित करण्यासाठी सुधारणात्मक उपाययोजना राबवाव्यात. तसेच हॉटेल्स व व्हिलांना असलेल्या अनधिकृत पाणी जोडण्यांची सखोल चौकशी करावी. नियमित व योग्य पाणीपुरवठ्याची घरगुती कुटुंबीयांना सोय करावी. सरकारने लोकांच्या संयमाची आणखीन परीक्षा घेऊ नये व या समस्येवर तातडीने लक्ष द्यावे. अन्यथा आमचे आंदोलन तीव्र करणार, असा इशारा या मोर्चेकरांनी अभियंत्यांना दिला.

Zarwada Vagator Water Mismanagement
Chia Seeds vs Cumin Water: चिया सीड्स की जिरंपाणी? केसांसाठी, त्वचेला ग्लो देण्यासाठी सर्वोत्तम काय?

अधिकाऱ्यांचे आश्‍वासन

साहाय्यक अभियंत्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले की, झरवाडा येथील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सोडविण्यासाठी पेयजल खात्याने हणजूण ओव्हरहेड पाण्याच्या टाकीपासून झरवाड्यापर्यंत नवीन जलवाहिनीचा प्रस्ताव ठेवला आहे. ही फाईल प्रक्रियेत आहे. तोपर्यंत तात्पुरती उपाययोजना करून ग्रामस्थांना आवश्यक पाणीपुरवठा केला जाईल. तसेच टँकरची व्यवस्था सुरूच राहील, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com