Mandrem Land Conversions: मांद्रेतील जमीन रूपांतरे थांबवा! माजी आमदार सोपटेंची मागणी

Dayanand Sopte: जमिनी घेण्यास येणारी मंडळी या स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊनच व्यवहार करीत असल्याचा दावा
Dayanand Sopte Mandrem
Dayanand Sopte MandremDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: मांद्रे मतदारसंघातील जमिनींची रूपांतरणे थांबवा, अशी मागणी माजी आमदार दयानंद सोपटे यांनी पत्रकार परिषदेत केली. हरमल, मोरजी, मांद्रे, पार्से आदी भागात लाखो चौरस मीटर जमीन रुपांतरित झाली असून जमिनी घेण्यास येणारी मंडळी या स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊनच व्यवहार करीत असल्याचा दावाही सोपटे यांनी यावेळी केला. पूर्वजांनी राखून ठेवलेले डोंगर व शेतजमिनी राखून ठेवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

सोपटे म्हणाले की, आपण केलेले कार्य मांद्रेतील जनता जाणून आहे, त्यामुळे विकासकामे न केल्याने घरी बसवले हा दावा निरर्थक आहे. जनतेची कामे करणे हे निवडून आलेल्या प्रत्येक आमदाराचे कर्तव्य असते. त्यामुळे श्रेयाचे राजकारण कुणी करू नये, असेही ते म्हणाले.

मांद्रे येथील पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोपटे बोलत होते. यावेळी गट अध्यक्ष मधू परब, राज्य कार्यकारिणी सदस्य अनंत गडेकर, उपाध्यक्ष गोविंद आसगावकर व सरचिटणीस धीरज मांद्रेकर उपस्थित होते.

सोपटे पुढे म्हणाले की, २०१९ मध्ये आमदारपदी निवड झाली. विरोधात असल्याने विकास शक्य नसल्याने भाजपच्या उमेदवारीवर लढलो व जिंकूनही आलो. तद्‍नंतर कोविड काळात दोन वर्षे गेली. सरकारकडे निधीची वानवा होती. सुदैवाने आपल्या प्रयत्नाने तुये इस्पितळात डायलेसिस युनिटचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हस्ते झाले व टप्प्याटप्प्याने अन्य कामेही मार्गी लावली, असे ते म्हणाले.

Dayanand Sopte Mandrem
Land Conversion In Goa: धक्कादायक माहिती! शिफारशीशिवाय केवळ मंत्र्यांच्या सहीने केलं गेलंय भू-रूपांतर

काजू बागायतीत बाऊन्सर का?

केवळ ३५७ मतांच्या फरकाने निवडणूक हरलो, म्हणजे जनतेने घरी बसवले म्हणणे योग्य नाही. या मतदारसंघाचे अनेकांनी प्रतिनिधित्व केले, परंतु या मतदारसंघात कधी बाऊन्सर दिसले नाहीत, दुर्दैवाने आज काजू बागायतीत देखील बाऊन्सर दिसू लागले आहेत. या मागची कारणे शोधणे आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले.

आमदाराने धूळफेक करू नये!

आमदारांना लोकांच्या इतका कळवळा असल्यास, त्यांनी जमिनीचे व्यवहार होण्यापूर्वी आवाज उठवावा. व्यवहार झाल्यानंतर लोकांच्या डोळ्यात धूळफेक करू नये. आगरवाडा भागातील जमिनींचे रुपांतरण झाले, त्या रद्द करून घ्याव्यात व जमिनी पूर्ववत द्याव्यात, असे सोपटे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com