खनिज वाहतूक विरोधात मयेवासी पुन्हा आक्रमक

भुमिकेशी ठाम असलेले मयेवासीय पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत.
Mayem
Mayem Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: गावातील अंतर्गत रस्त्याने नियमबाह्य खनिज वाहतूक नकोच. या भुमिकेशी ठाम असलेले मयेवासीय पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. मये भू-विमोचन समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच सखाराम पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मंगळवारी सकाळी गावकरवाडा येथे खनिज वाहतूक करणारे ट्रक रोखून धरले आहेत. (Local re-aggression in Mayem against mineral transportation)

Mayem
गोवा किनाऱ्यांवरील गैरकृत्‍यांना फाटा
खनिज वाहतूक विरोधात मयेवासी पुन्हा आक्रमक
खनिज वाहतूक विरोधात मयेवासी पुन्हा आक्रमकDainik Gomantak

गावातून खनिज (Mining) वाहतूक नकोच. ही मयेवासीयांची मुख्य मागणी आहे. गेल्या बुधवारी (ता.16) मयेवासियांनी खनिज वाहतूक रोखली असता, सरपंचांसह आठजणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर खनिज वाहतुकी विरोधात अधिकच तापले आहे.

मयेवासियांचा (Mayem) वाढता विरोध असलेल्या खनिज वाहतूक विषयी तोडगा काढण्यासाठी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या निर्देशानुसार डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी काल (सोमवारी) बोलावलेली बैठकही निष्फळ ठरली होती. मंगळवारी सकाळी खनिज वाहतूक रोखली असली, तरी सकाळी दहा वाजेपर्यंत वातावरण शांत होते. लोक हळूहळू आंदोलनस्थळी जमत आहेत. दहा वाजेपर्यंत तरी सरकारी अधिकारी किंवा पोलिस आंदोलनस्थळी फिरकलेले नाहीत. तरी नागरिकांचा पवित्रा पाहता दुपारपर्यंत आंदोलन तापण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com