थांबा...! पाण्यात उतरणे धोक्याचे, फोंडा पोलिसांची नागरिकांना सुचना

पोलिस, पत्रकारांनी लावले धोक्याचे सूचना फलक, उपजिल्हाधिकारी, गोवा कॅननेही घेतला आढावा
Danger notice board
Danger notice boardDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: पाण्यात बुडून मरण पावण्याचे प्रकार फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत वाढले असून मौजमजा करण्यासाठी येणाऱ्यांकडून काळाचे आणि वेळेचे कोणतेच बंधन पाळले जात नसल्यामुळे जास्त करून युवक आपले जीव गमावून बसतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी फोंडा पोलिस व अंत्रुज पत्रकार संघातर्फे संयुक्तपणे जागृती मोहीम राबवण्यात आली. आज (मंगळवारी) फोंडा पोलिस तसेच अंत्रुज पत्रकार संघातर्फे ओकांब व कोडार भागात नदीत आंघोळ करणाऱ्यांसाठी धोक्याचा सूचना फलक लावण्यात आले.

यावेळी अंत्रुज पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते. अंत्रुज पत्रकार संघातर्फे आतापर्यंत अनेक विधायक उपक्रम साकारण्यात आले असून दूधसागर व खांडेपार नदीत बुडून मरण्याचे प्रकार वाढल्याने पत्रकार व पोलिसांच्या बैठकीत लोकांना धोकादायक ठिकाणाविषयी माहिती मिळावी आणि त्यांनी सावध व्हावे यासाठी सूचना फलक लावण्याचे ठरले, त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली. यावेळी फोंड्यातील पत्रकारांसह पोलिस उपअधीक्षक सी. एल. पाटील, पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर तसेच इतर पोलिस उपस्थित होते.

Danger notice board
गोव्यातील विविध किनारपट्टीवर तेलगोळ्यांचा खच!

उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

फोंडा व कुळे पोलिस स्थानक परिसरातील नद्यांत बुडून मरण पावण्याचे प्रकार सातत्याने होत असल्याने गोवा कॅन या स्वयंसेवी संघटनेतर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन करून या संबंधीच्या स्थितीचा आढावा घेण्याच मागणी केल होती. त्यानुसार फोंड्याचे उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांनी जलस्त्रोत खाते, कृषी खाते तसेच पोलिस व अग्निशामक दल आणि इतरांची एक संयुक्त बैठक घेऊन आवश्‍यक सूचना केल्या. तालुक्यात असलेल्या उघड्या विहिरी व तळ्यांसबंधीची माहिती संबंधित सरकारी खात्यांनी द्यावी असे उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Danger notice board
मोपा विमानतळामुळे आटला 'हाळीचा झरा‘ !

प्रत्येकाने खबरदारी घ्यावी...!

मौजमस्ती करण्यासाठी अनेक युवा युवती दूधसागर व खांडेपार नदीच्या किनारी येतात आणि सरळ पाण्यात उतरतात. काहीजणांना तर पोहताही येत नाही. वास्तविक पाण्याची खोलाई तसेच धोकादायक जागांसंंबंधी या लोकांना काहीच माहिती नसते, त्यामुळेच बुडण्याचे प्रकार होत आहेत. दुर्दैवाने युवायुवती बुडण्याचे प्रकार घडले असून लोकांना माहिती व्हावी यासाठी धोक्याचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. वास्तविक या नद्या आंघोळीसाठी नाहीत, हे प्रत्येकाने ध्यानात घ्यावे.

- सी. एल. पाटील, पोलिस उपअधीक्षक, फोंडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com