गोव्यातील विविध किनारपट्टीवर तेलगोळ्यांचा खच!

पर्यटकांनी फिरवली पाठ: सासष्टी, मोरजीमध्ये तेलतवंगामुळे विद्रुप दृश्‍य
Goa Beaches
Goa BeachesDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: देशातील विविध भागातून पर्यटक मोरजी किनारी भागात समुद्रस्नासाठी येत असले तरी सध्या किनाऱ्यावर डांबरगोळे आले असल्याने पर्यटक हिरमसून माघारी फिरत आहेत. किनाऱ्यावर गोळे आल्यामुळे परिसर विद्रूप झाला आहे.

मांद्रे मतदारसंघातील मोरजी, अश्वे-मांद्रे, हरमल व केरी तेरेखोल या गावाना सर्वांगसुंदर अशी किनारपट्टी लाभली आहे. या भागात दरवर्षी पर्यटक हंगामात लाखो पर्यटक येतात. उन्हाळ्याच्या दिवसात हजारो देशी नागरिक समुद्रस्नानासाठी येतात. मात्र किनारी भागात पार्किंग व्यवस्था नाही, साधी चेंजिंग रूम व शौचालयाची व्यवस्था नसल्याने सरकारने त्या सोडवाव्यात, अशी मागणी उदय मांद्रेकर यांनी केली.

Goa Beaches
खरी कुजबुज... गोव्यातील पंचायत निवडणुकांचा वादही न्यायालयात जाणार?

मांद्रे मतदारसंघातील किनारी भागात पार्किंगची मोठी गैरसोय आहे. जमिनींना सोन्याचे भाव आल्याने मोकळ्या जागेत तारेची व दगडी कुंपणे घातल्याने व रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण करून बांधकामे केल्याने रस्त्यावरही वाहने पार्क केली तर वाहतूक कोंडी होते. त्यावरही आतापर्यंत सरकारला उपाय योजना करता आली नाही. पार्किंग व्यवस्था नसल्याने पर्यटकांना मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करतात, असे व्यावसायिक प्रमेश मयेकर म्हणाले.

समुद्रात काही जहाजे किंवा मोठ्या बोटी जलतरण करत असतात. त्यामधून त्यांची जळकी ऑईल दरवर्षी किनाऱ्यावर येते किंवा सोडली जाते. त्यामुळे ही किनाऱ्यावर येते. वाळू आणि तेल याचे मिश्रण होऊन तेलगोळे होत असल्याचे अंदाज असून, केंद्र सरकारच्या पर्यटन खात्याची मदत घेऊन यावर योग्य ती उपाययोजना केली जाईल.

- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

मडगाव: रूपेरी वाळूसाठी जगप्रसिद्ध असलेली सासष्टीच्या बाणावलीपासून केळशी पर्यंतची किनारपट्टी तेल तवंग पसरल्याने काळी ठिक्कर पडली आहे. सद्यःस्थितीत या किनारपट्टीवरून सध्या चालणेही मुश्किल बनले आहे.

मागचे तीन दिवस हे काळे तेलाचे गोळे समुद्रातून किनाऱ्यावर येऊ लागल्याने पर्यटकांनीही या किनारपट्टीकडे पाठ फिरवली आहे. काही ठिकाणी मूठभर लांबीचे तेल गोळे आढळून आले आहेत.

Goa Beaches
वाळपई येथील ‘फिनिक्स’तर्फे दोन वैमानिकांचा झाला सत्कार

मागच्या तीन चार दिवसांपासून हा प्रकार चालू आहे अशी माहिती स्थानिक मच्छिमार पेले फर्नांडिस यांनी दिली. मात्र कालपासून हे प्रमाण कमी होत असल्याचेही त्यांनी सांगितले. या तेल गोळ्यामुळे किनाऱ्यावर मासळीचे जाळे आणनेही मुश्किल बनल्याचे त्याने सांगितले.

सध्या पर्यटन मोसम ओसरू लागल्याने किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत नाहीत. मात्र जे थोडेफार फिरकत होते त्यांनीही ही किनारपट्टी तेल तवंगामुळे चिकट झाल्याने येणे बंद केले आहे.

मागच्या काही वर्षांत तेलगोळे किनाऱ्यावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा पर्यटन व्यवसायावरही विपरित परिणाम होत आहे. किनाऱ्यावर आलेले तेलगोळे यामुळे किनारपट्टीला ओंगळवाणे स्वरुप प्राप्त झाले आहे.

- क्रूझ कार्दोज

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com