Goa Tourism Department: माेरजी किनाऱ्यावर कुटिर व्यावसायिकांचे साहित्य जप्त!

Goa Tourism Department: धडक कारवाई झाल्यामुळे पर्यटकही भयभीत झाले.
Morjim Beach
Morjim BeachDainik Gomantak

Morjim Beach: विठ्ठलदास वाडा या किनारी भागात एकूण तीन कुटिरे व्यावसायिकांनी शेकडो लाकडी खुर्च्या, टेबले व पलंग किनाऱ्यावर थाटले होते. पर्यटन खात्यामार्फत खात्याचे उपसंचालक गजानन महाले यांच्या नेतृत्वाखाली काल शुक्रवारी त्यांच्यावर कारवाई करत हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. अचानक कारवाई झाल्यामुळे पर्यटकही भयभीत झाले होते.

पूर्वी ऑक्टोबर ते मे महिना या कालावधीत पर्यटन हंगाम जोरात सुरू असायचा. परंतु हल्ली वर्षभर पर्यटक किनारी भागात येतात. या पर्यटकांची सोय करण्यासाठी स्थानिक आणि बिगर व्यावसायिक किनारी भागात मोठ्या प्रमाणात लाकडी पलंग, कुटिरे, रेस्टॉरंट उभारतात. त्यासंबंधी शेकडो लाकडी पलंगांवर कारवाई केली.

Morjim Beach
Goa Morjim Beach: कचऱ्यांच्या राशी तशाच; मोदींच्या वाढदिवसानंतर पुन्हा 'ये रे माझ्या मागल्याच'

तसेच, ही कारवाई करताना या भागात कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा ठेवला होता. मोरजी किनारी भागात मोठ्या प्रमाणात लाकडी पलंग घातल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. आणि त्यानुसार पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी या किनारी भागाची पाहणी करून ज्या व्यावसायिकांनी लाकडी पलंग घातले होते त्यांना इशारा दिला होता. तरीही काही व्यावसायिकांनी याकडे दुर्लक्ष केले.

लाकडी पलंग, खुर्च्या, व टेबले नेण्यासाठी पर्यटन खात्याने छोटी वाहने आणली होती. कारवाई सुरू असतानाच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काही व्यावसायिकांनी पलंग इतरत्र लपवून ठेवले. तरीही मोठ्या प्रमाणात पलंग जप्त करण्यास अधिकाऱ्यांनी यश मिळवले, अशी माहिती स्थानिक संजय कोले यांनी दिली.

Morjim Beach
Morjim: मांद्रे, मोरजीत ‘सीआरझेड’ धाब्यावर!

कारवाई अशीच चालू राहणार-

पर्यटन खात्याचे उपसंचालक गजानन महाले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याशी संपर्क साधला असता ही कारवाई अशीच कायमस्वरूपी चालू राहणार आहे. ज्यांनी अजून कोणी हे लाकडी पलंग घालण्यासाठी परवाने घेतलेले नाहीत त्यांनी परवाने घ्यावेत आणि कायदेशीर व्यवसाय करावा. बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांंवर या पुढेही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com