Goa Safety Concern: पणजीत नागरिकांच्या जीवाशी खेळ! सांतिनेज परिसरातील धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष; रहिवाशांमध्ये भीती

Dangerous Buildings In Goa: पणजीतील सांतिनेज परिसरातील गामा पिंटो मार्गावरील पॅलेसियो दी गोवा हॉटेल परिसरातील काही खासगी इमारती जीर्ण झाल्या आहेत.
Panaji area buildings in need of repair
Panaji Old BuildingsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजीतील सांतिनेज परिसरातील गामा पिंटो मार्गावरील पॅलेसियो दी गोवा हॉटेल परिसरातील काही खासगी इमारती जीर्ण झाल्या आहेत. या इमारतींचा रस्त्याच्या बाजूचा भाग धोकादायक दिसत आहे.

पादचाऱ्यांना या इमारतींच्या खालून जाताना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. महानगरपालिकेला याची कल्पना असली तरी त्याविषयी कडक पावले उचलली जात नसल्याचे येथील नागरिक सांगतात.

रस्त्याच्या बाजूचे सज्जे आणि गॅलरीचे भाग जीर्ण झालेले आहेत. या इमारतींचा कालावधीही संपला आहे. काही ठिकाणी इमारतीच्या बांधकामाने जागा सोडली आहे, ते भाग कधीही कोसळू शकतात, अशी स्थिती आहे.

Panaji area buildings in need of repair
Rose Garden Panaji: कोट्यवधी खर्च करून उभारले 'रोझ गार्डन', गुलाब कधी उमललेच नाहीत; पणजीतील उद्यानाच्या उद्देशालाच हरताळ

एका इमारतीचे प्लास्टरचे तुकडे निसटून खाली पडत आहेत. इमारतीच्या खालील एका दुकान चालकाने इमारतीचा तो धोकादायक कोपऱ्यावर प्लास्टिक जाळीदार तावदान लावले असले तरी तो तात्पुरता उपाय आहे. या इमारती रहिवाशांसाठी धोकादायक बनल्या आहेत, परंतु तेथील रहिवाशांचे स्थलांतर करण्याविषयी संबंधित सोसायटीने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.

Panaji area buildings in need of repair
Panaji: पणजीवासीयांसाठी गुड न्यूज! रस्ते, सांडपाणी निचऱ्याची कामे संपली; पदपथ सौंदर्यीकरणासाठी 30 जूनपर्यंत मुदत

अनेक वर्षांपासून येथील जीर्ण इमारतींचा स्थलांतराचा विषय भिजत पडलेला आहे. खरे तर सोसायटीने आणि लोकप्रतिनिधींनी हा विषय तातडीने सोडविला पाहिजे, अघटीत घटना घडल्यानंतर धावाधाव करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया पणजीतील नागरिक व्यक्त करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com