Panaji: पणजीवासीयांसाठी गुड न्यूज! रस्ते, सांडपाणी निचऱ्याची कामे संपली; पदपथ सौंदर्यीकरणासाठी 30 जूनपर्यंत मुदत

Panaji Smart City: गेल्या मार्चमध्ये पणजी स्मार्ट सिटी योजनेखाली सुरू असलेल्या कामांसाठी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून कामाची माहिती दिली.
Panaji Smart City Work
Panaji Smart City WorkDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Panaji Smart City News: पणजी स्मार्ट सिटी योजनेखाली शहरातील रस्त्यांची तसेच सांडपाणी निचऱ्याची कामे पूर्ण झाली आहेत, त्याची छायाचित्रासह माहिती दिली. काही किरकोळ कामे उरली आहेत. पदपथावरील सौंदर्यीकरणाच्या कामासाठी ३० जूनपर्यंत मुदत आहे, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिल्याने गोवा खंडपीठाने ही सुनावणी येत्या १५ जुलैपर्यंत तहकूब केली आहे.

दोन वर्षांपूर्वी पणजी शहरातील रस्त्यांच्या कामाची तसेच भूमिगत सांडपाणी व मलनिस्सारण वाहिनींसाठी खोदण्यात आलेल्या कामामुळे रस्त्यांच्या बाजूने निवासी लोकांना व आस्थापनांना धूळ समस्या तसेच वाहतुकीची अडचण भासली होती.

त्यामुळे यासंदर्भात दोन वेगवेगळ्या याचिका उच्च न्यायालयात सादर झाल्या होत्या. या याचिकांची गंभीर दखल घेत गोवा खंडपीठाने सरकारला या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे निर्देश दिल्यावर कामात सुसूत्रता आली होती. वेळोवेळी कामाचा आढावा खंडपीठाकडून घेण्यात आल्याने ही कामे मार्गी लागली होती.

Panaji Smart City Work
Panaji Smart City: स्मार्ट पणजीसाठी एका सल्लागाराला 8 कोटी दिले! असे किती सल्लागार आहेत? किती पैसे संपले?

यावर्षी गेल्या मार्चमध्ये पणजी स्मार्ट सिटी योजनेखाली सुरू असलेल्या कामांसाठी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून कामाची माहिती दिली. रस्त्याची व मलनिस्सारण वाहिनीची कामे ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण केली जातील तर पदपथावरील सौंदर्यीकरणाची कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याची हमी खंडपीठाला दिली होती.

Panaji Smart City Work
Panaji Smart City: पावसाळ्यानंतरच उलगडणार रस्त्यांचा दर्जा! पणजीत अजूनही उर्वरित 'स्मार्ट' कामं सुरूच

त्यानुसार हे काम होत असल्याने खंडपीठानेही समाधान व्यक्त करत उर्वरित कामे पूर्ण करून त्याची माहिती देण्यासाठी ही सुनावणी पुढे ठेवली. याचिकादाराच्या वकिलांनीही ही कामे पूर्ण होत आल्याचे खंडपीठाला सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Santinez Footpath Damage Panaji
Goa Assembly Election 2027
Goa Caste Wise Census
Panaji Smart City Rs 146 crore
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com