
पणजी: कॅनडा (Canada) येथील प्रतिष्ठेच्या ओटावा इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Ottawa Indian Film Festival) ‘स्थलपुराण’ (Sthalpuran) या मराठी चित्रपटाने (Marathi movie) अटकेपार झेंडा फडकाविला आहे. या चित्रपटाचे अक्षय इंदिकर (Akshay Indikar) हे सर्वोकृष्ट दिग्दर्शक ठरले, तर सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार नील देशमुख (Neil Deshmukh) याने पटकावला आहे.
वास्को (Vasco) येथील संजय शेट्ये (Sanjay Shetty) यांनी विन्सन अकादमी ऑफ फिल्म ॲण्ड मीडियाद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गोव्याच्या (Goa) दृष्टीने ही भूषणावह बाब ठरली आहे. यापूर्वी केरळ (Kerala) येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (International Film Festival) या चित्रपटाला दोन पुरस्कार प्राप्त झाले होते. तसेच न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२१ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व सर्वोत्कृष्ट बाल कलाकार विभागात नामांकन प्राप्त झाले होते.
शिवाय फ्री प्रेस इंडिया ग्रँड प्रीक्स २०२० मध्ये फिचर फिल्म विभागात नामांकन प्राप्त झाले होते. या चित्रपटाचे आणखी एक मोठे यश म्हणजे, सहाव्या वार्षिक फिल्म क्रिटिक्स सर्कल ऑफ इंडिया २०२१ साठी त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट विभागात नामांकन प्राप्त झाले. याच वर्षाच्या प्रारंभी ‘स्थलपुराण’ला इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ लॉस एंजेल्समध्ये समारोपाचा चित्रपट प्रदर्शनाचा मान मिळाला.
संजय शेट्येंची ख्याती सातासमुद्रापार
विन्सन वर्ल्डचे संस्थापक अध्यक्ष संजय शेट्ये यांनी गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवून या महोत्सवाची ख्याती सतासमुद्रापालिकडे पोहोचविली आहे. कॅनडा येथे गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करून त्यांनी आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विन्सन वर्ल्ड निर्मित ‘दिगंत’ या कोकणी चित्रपटाने ४३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमामध्ये लक्ष वेधून घेतले होते. ‘शांतेचे कार्ट चालू आहे’ या नाटकाची निर्मिती करून विन्सनने महाराष्ट्र व दुबई येथे मिळून शंभरपेक्षा जास्त प्रयोग केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.