कदंब बस स्थानकावरील चहा स्टॉल कारवाईस 28 जूनपर्यंत स्थगिती

गोवा कॅन या ग्राहक चळवळीतील संघटनेने केली होती तक्रार
Kadamba bus stand madgaon
Kadamba bus stand madgaonDainik Gomantak

मडगाव खास प्रतिनिधी : मडगाव पालिकेचा कुठलाही परवाना न घेता मडगाव येथील कदंब बस स्थानकावर उभारलेला चहाचा स्टॉल पाडण्याच्या मडगाव पालिकेच्या आदेशाला नगरपालिका प्रशासकीय लवादाने दिलेली स्थगिती आज 28 जूनपर्यंत वाढविण्यात आली. (Stay on action against illegal tea stall on Kadamba bus stand madgaon)

Kadamba bus stand madgaon
'...त्यामुळे राज्यात मास्कबंदी नाही'

मडगाव कदंब बसस्थानकाच्या पार्किंगच्या जागेत हा दोन मजली स्टॉल उभारण्यात आला असून तो वाहतूकीसाठी धोकादायक ठरु शकतो. अशी भीती गोवा कॅन या ग्राहक चळवळीतील संघटनेने व्यक्त करून त्या विरोधात मडगाव पालिकेकडे तक्रार केली होती. हा स्टॉल उभारताना पालिकेकडून कुठल्याही प्रकारचा परवाना घेतलेला नाही. याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते.

Kadamba bus stand madgaon
गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांच्या अटकेचा गोवा काँग्रेसकडून निषेध

या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने पालिका मुख्याधिकारी आग्नेल फेर्नांडिस यांनी 21 मार्च रोजी हे बांधकाम पाडून टाकण्याचा आदेश दिला होता. या स्टॉलच्या मालकाने या आदेशाला प्रशासकीय लवादासामोर आव्हान देताना, हे स्टॉल उभारण्यास आपल्याला कदंब महामंडळाकडून परवानगी मिळाली असून त्यासाठी आपण महामंडाळकडे 1 लाख रुपये डिपॉझिट ठेवले आहे. तसेच हा स्टॉल उभारण्यास आपल्याला बराच खर्च आला आहे. असे आव्हान अर्जात म्हटले आहे. या आव्हान अर्जावर आता 28 जूनला पुढील सुनावणी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com