गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांच्या अटकेचा गोवा काँग्रेसकडून निषेध

काँग्रेस विधीमंडळ गटाचा जिग्नेश यांना पूर्ण पाठिंबा
goa congress
goa congressDainik Goma
Published on
Updated on

पणजी : गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांनी 22 एप्रिल रोजी उशिरा रात्री गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातून अटक केली. व दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने गुवाहाटीला नेले. तेथून त्यांना रस्तेमार्गाने कोक्राझार येथे नेण्यात आले होते. या अटकेचा निषेध नोंदवत जिग्नेश यांना गोवा प्रदेश काँग्रेसकडून संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी घेतलेल्या बैठकीत केंद्राकडून विरोधकांचा आवाज दडपला जात आहे. असा आरोप करण्यात आला आहे. (Goa Congress protests arrest of Gujarat MLA Jignesh Mewani)

goa congress
बांबोळीत भरधाव कारची डिव्हायडरला धडक

ही बैठक 25 एप्रिल रोजी दुपारी पार पडली. या बैठकीस गोवा काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो, गोव्याचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत तसेच गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी लोबो यांनी गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांच्यावर झालेली कारवाई ही भाजप जाणिवपुर्वक विरोधकांचा आवाज दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं ते यावेळी म्हणाले.

goa congress
तृणमूल काँग्रेसला धक्का, कविता कांदोळकरांचा राजीनामा

गुजरात विधानसभेत सध्या एकमेव अपक्ष आमदार असलेले मेवानी यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये काँग्रेसबाबत निष्ठा व्यक्त केली होती. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नसला, तरी पुढील निवडणूक आपण काँग्रेसच्या तिकिटावर लढणार असल्याचे सांगितले आहे. मेवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या एका ट्वीटबाबत कोक्राझार येथील भाजपच्या एका स्थानिक नेत्याने केलेल्या तक्रारीच्या आधारे मेवानी यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com