Vasco Police : 'अंमली पदार्थांपासून दूर रहा', वास्को पोलिसांमार्फत जनजागृती

गोव्यात अंमली पदार्थांमध्ये तरुण युवक युवतींचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे
Vasco Police
Vasco PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन 26 जूनला साजरा केला जातो. अंमली पदार्थांचे सेवन शारीरिक, मानसिक आरोग्यावर कसे दुष्परिणाम करते याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा साजरा केला जातो.

गोव्यात अंमली पदार्थांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये तरुण युवक युवतींचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे.

Vasco Police
Kadamba Bus Services: चिखलात रुतलेल्या कदंब बसला विद्यार्थ्यांचा दे धक्का! जांबावलीतील प्रकार

राज्यात अंमली पदार्थ विरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी सरकारने कंबर कसली असून गोवा पोलिसांनी जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबविली आहे. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी वास्को पोलिसांमार्फत वास्कोत जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

वास्को पोलिस स्थानकांचे निरीक्षक कपिल नायक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी 'अंमली पदार्थ ' विरोधात मोहीम राबवून समाजात चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

वास्को पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक मयूर सावंत यांनी 'ड्रग्ज' पासून स्वत: बरोबर इतरांना दूर ठेवण्याचे आवाहन केले. अंमली पदार्थ सेवन करणे कायद्याने गुन्हा असून यात कोणी अडकला तर त्याच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात येतात. यासाठी सर्वांनी अंमली पदार्थां पासून दूर राहावे असे आवाहन उपनिरीक्षक मयूर सावंत यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Air India reduces flights to Goa
Baina Sewage Pump Failure
Vasco Dowry Harassment Case
Hindutva and Modernity analysis
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com