मौल्यवान वस्तू ताब्यात घेण्यासाठी MUCB कडुन लॉकरधारकांना अंतिम सूचना

तब्बल 250 लॉकरधारकांचा ठावठिकाणाच नाही अशी माहिती समोर आली आहे
MUCB
MUCB Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मडगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेने लॉकर धारकांना लॉकर्स सरेंडर करण्यासाठी तसेच त्यांच्या मौल्यवान वस्तू ताब्यात घेण्यासाठी अंतिम नोटीस बजावली आहे. तब्बल 250 लॉकरधारकांचा ठावठिकाणाच नाही अशी माहिती समोर आली आहे. लॉकर धारकांना नोटीसचे पालन करण्यासाठी आठ दिवसांचा अवधी दिला आसुन, लिक्विडेटरने 31 ऑगस्ट रोजी (Margao Urban Bank) च्या सर्व लॉकर धारकांना त्यांचे लॉकर्स सरेंडर करण्याचे आणि 30 सप्टेंबर 2021 पूर्वी किंवा त्यापूर्वी त्यांच्या मौल्यवान वस्तू ताब्यात घेण्याचे आवाहन केले होते. (Final notice to locker holders from MUCB for possession of valuables)

MUCB
म्हापशात कार्निव्हल उत्साहात

या संदर्भात, शाखा व्यवस्थापकांनी लॉकर धारकांना अंतिम नोटीस त्या जारी केली होती, त्यांना नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत लॉकर्स सरेंडर करण्याची सूचना दिली होती.

लिक्विडेटर-नियुक्त विशेष अधिकारी, किशोर आमोणकर यांनी माहिती दिली की, अनेक लॉकरधारकांनी लॉकर्स सरेंडर करण्यासाठी आणि त्यांच्या मौल्यवान वस्तू ताब्यात घेण्यासाठी आले होते मात्र, अजूनही काही नागरिक आलेले नाहीत. ते म्हणाले पुढे म्हणाले की, “जर धारक आले नाहीत तर आम्ही आता लॉकर उघडण्याचे ठरवत आहोत, तसेच मौल्यवान वस्तू मुख्य कार्यालयात शिफ्ट करण्यात येणार आहेत, MUCB च्या काही शाखा भाड्याच्या जागेतून चालत असल्याने लॉकर्स या जागेत जास्त काळ राहू शकत नाहीत. त्यामुळे नियोजित तारखेनंतर मौल्यवान वस्तू ताब्यात घेऊन मुख्य कार्यालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com