Goa Pollution Control Board: सांकवाळ-शिंदोळी नाला प्रदूषित; आंतोन वाझ यांच्याकडून पाहणी

Goa Pollution Control Board: सांकवाळ-शिंदोळी येथील नाल्यात दुर्गंधी पसरली असून मोठ्या प्रमाणात मासे मृत होत आहेत.
Sancoale Shindoli brook polluted Anton Vaz conducted the inspection along with Goa Pollution Control Board officials
Sancoale Shindoli brook polluted Anton Vaz conducted the inspection along with Goa Pollution Control Board officials Dainik Gomantak

Goa Pollution Control Board: सांकवाळ व झुआरीनगर भागातील चार नाल्यानंतर आता सांकवाळ-शिंदोळी येथील नालाप्रदूषित झाल्यामुळे नाल्यातील मासेमृत झाले. इतर जीवजंतूवरही संकटाची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली. आमदार आंतोन वाझ यांनी या दुर्गंधीयुक्त नाल्याची पंच सदस्य व गावकऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी केली.

आमदार आंतोन यांनी शनिवारी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत सांकवाळ व झुआरीनगर भागातील चार नाल्यांची पाहणी केली होती. या नाल्यांमधून उग्र वास येत असल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत. मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या नाल्यांमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

सांकवाळ आणि झुआरीनगरातील नाल्यांमध्ये उग्रवास येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन आमदार वास यांनी ही माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार संयुक्तरीत्या त्या नाल्यांची पाहणी करण्यात आली. नाल्यांमधील पाण्याला येणारा वास नेमका कसला याचा उलगडा पाण्याच्या नमुन्यांच्या तपासणीनंतरच होणार आहे.

सांकवाळ-शिंदोळी येथील नाल्यात दुर्गंधी पसरली असून मोठ्या प्रमाणात मासे मृत होत आहेत. हा गाव झुआरीनगरच्या सखल भागात असून या गावातून एक पारंपरिक नाला वाहतो. मात्र गेले पंधरा दिवस झाले, या नाल्यात दुर्गंधी पसरली आहे. झुआरीनगरातील सांडपाण्यामुळे शिंदोळी येथील डाऊन सांकवाळ नाल्यापर्यंतचे पारंपरिक नाल्याचे पाणी प्रदूषित झाले आहे.

या गावातून वाहत असलेल्या पारंपरिक पाण्याचा वापर येथील गावकरी कपडे धुण्यासाठी करतात आणि ते पाणी त्यांच्या शेतातही वापरले जाते. गावकऱ्यांनी या पारंपरिक नाल्यामध्ये अस्वच्छ पाणी सोडणाऱ्याविरुद्ध तक्रार केली आहे. कोणतीही गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्यापूर्वी नाला स्वच्छ करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यासंदर्भात आमदारांशीही चर्चा केली आहे.

Sancoale Shindoli brook polluted Anton Vaz conducted the inspection along with Goa Pollution Control Board officials
Water Shortage : तयडे गावाला टँकरची प्रतीक्षा; सुर्ला, बाराभूमी, बोळकर्णेला किंचित दिलासा

कठोर कारवाई होणार!

वाझ यांनी या दुर्गंधीयुक्त नाल्याची पाहणी केली. तसेच त्यांनी झुआरीनगर येथे वरील भागातही जाऊन पाहणी केली. तेव्हा ते म्हणाले, या नाल्यातून मलनिस्सरणचे सांडपाणी सोडले जात असावे, असे जर कोणी करीत असेल तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल, टँकरचा परवानाही रद्द करण्यात येईल. जलप्रवाहांचे रक्षण करणे गरजेचे आहे. स्थानिक नागरिकांतप्रमाणेच इतरांनाही अशा घटनांवर लक्ष देणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com