पणजी: पावसाळा म्हटले की मक्याची कणसे आणि भुईमूगाच्या शेंगांची आवक बाजारात वाढलेली दिसते. परंतु मक्याच्या कणसाला असणारी मागणी पाहता त्यांचे भाव सध्या दुप्पट झाल्याचे दिसतात. काही महिन्यांपूर्वी 50 रुपयांना मक्याची चार कणसे मिळत होते. पण, आता शंभर रुपयांना सहा कणसे मिळत आहेत. (In the state of Goa, the price of maize increased )
मान्सून मध्यावर पोहोचला आहे. आणि आषाढ संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आषाढ, श्रावण महिन्यात बाजारात मक्याच्या कणसांना आणि भुईमूगांच्या कच्च्या शेंगांना अधिक मागणी असते. मागील चार-पाच महिन्यांपूर्वी मक्याची चार कणसे 50 रुपयांना मिळत होती. आता शंभर रुपयांना सहा कणसे मिळत आहेत. पणजी बाजारातील विक्रेत्यांच्या मते बेळगाव बाजारातच मक्याच्या कणसाचे दर वाढवून येऊ लागले आहेत.
गोव्यात मागणी वाढत असल्याचे दिसले की तेथील घाऊक व्यापारी दर वाढवून पाठवून देतात, त्यामुळे काही रुपयांचा नफा पकडून त्याची विक्री करावी लागते. ज्यावेळी 50 रुपयांना 4 नग मिळत होती, त्यावेळी एका कणसाची किंमत 12.50 रुपये होत होती. त्याशिवाय हातगाडीवर कणसे भाजून विक्री करणारे फिरते विक्रेते एका भाजलेल्या कणसाला 20 रुपये आकारत होते. आता बाजारात कणसाचे वाढलेले दर पाहून भाजून विक्री करणारे एका कणसाला ते 30 रुपये आकारतात.
टॅक्सीमध्ये डिजिटल मीटरचा वापर सुरू करा - मंत्री गुदिन्हो
पणजी: राज्यातील टॅक्सीमध्ये बसवण्यात आलेले डिजिटल मीटर वापरला जात नसल्याचे उघड झाल्यानंतर वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी याची गंभीर दखल घेत टॅक्सी मालकांना मीटर वापरासंबंधी सक्त ताकीद दिली आहे. त्यामुळे सरकार आणि टॅक्स संघटनांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. परंतु, लवकरात लवकर मीटरचा वापर करण्याबाबत सरकार अजूनही का विलंब करत आहे, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.