CM Pramod Sawant: मच्छीमार पदवी अभ्यासक्रम सुरु करणार! मुख्यमंत्र्यांची जाहीर घोषणा

Fisheries Degree Program: विद्यार्थ्यांनी गोव्यातच शिक्षण घ्यावे यासाठी अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे
Fisheries Degree Program: विद्यार्थ्यांनी गोव्यातच शिक्षण घ्यावे यासाठी अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मच्छीमार हा व्यवसाय गोमंतकीयांकडे आहे आणि तो हातातून निसटू नये, यासाठी प्रत्येक पंचायतीत एक व्यावसायिक तयार होणे गरजेचे आहे. सरकार आपल्या पद्धतीने मच्छीमार व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकार मच्छीमार पदवी अभ्यासक्रम सुरु करणार असल्याची जाहीर घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. बाहेर जाऊन हा अभ्यासक्रम पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना सरकार सबसिडी देतच आहे, पण त्यांनी बाहेर जाऊ नये आणि गोव्यातच शिक्षण घ्यावे यासाठी अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे.

मत्स्यव्यवसाय संचालनालयातर्फे पणजी येथील मत्स्य जेट्टी येथे आयोजित नारळी पौर्णिमा सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समुद्राला नारळ अर्पण केला. यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री नीळकंठ हळर्णकर, पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात, मत्स्यव्यवसाय सचिव ई. वल्लवन, मत्स्यव्यवसाय संचालक डॉ. शर्मिला मोंतेरो आणि इतर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मत्स्य मलाया वाहिनी, मत्स्य आहार आणि कृत्रिम रीफ या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी विविध योजनांतर्गत १५ लाभार्थ्यांना मंजूरी आदेश जारी करण्यात आले. यात बर्फाच्या पेट्या असलेल्या मोटारसायकली, बर्फाच्या पेट्या असलेली तीनचाकी वाहनांचा समावेश आहे.

Fisheries Degree Program: विद्यार्थ्यांनी गोव्यातच शिक्षण घ्यावे यासाठी अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे
Fisheries Union: बोटींच्या नुकसान भरपाईपायी मच्छिमारांनी केलीय 'एवढ्या' रकमेची मागणी

सबसिडी उपलब्ध

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, पूर्वी ठराविक समाजाचेच लोक मच्छिमार व्यवसाय करत होते, परंतु आज हा व्यवसाय इतर समाजातील लोक देखील करतात. या व्यवसायात फायदा आहे आणि प्रत्येकाने व्यवसाय केला पाहिजे. आम्ही खात्यातर्फे व्यवसाय करू पाहत असलेल्यांना सबसिडी देऊन पाठिंबा देखील देतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com