CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांनी तपासला गोव्याच्या 'वित्त विभागाचा' रिपोर्ट! केंद्रीय योजनांच्या लाभाचाही घेतला आढावा

State Finance Department: राज्याचे वित्तीय आरोग्य कसे आहे हे आज वित्तमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाणून घेतले. वित्त सचिव डॉ. व्ही. कांदावेलू यांच्यासह वित्त खात्यातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर खाते प्रमुख मंत्रालयात झालेल्या या बैठकीत सहभागी झाले होते.

Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्याचे वित्तीय आरोग्य कसे आहे हे आज वित्तमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाणून घेतले. वित्त सचिव डॉ. व्ही. कांदावेलू यांच्यासह वित्त खात्यातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर खाते प्रमुख मंत्रालयात झालेल्या या बैठकीत सहभागी झाले होते. केंद्रीय योजनांचा कितपत लाभ घेण्यात विविध खाती यशस्वी झाली याविषयी मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली.

दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय योजनांचा लाभ घेण्‍यासाठी प्रस्ताव तयार करून ते दिल्लीतील निवासी आयुक्तांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रालयात सादर करावेत अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्या योजनांचा लाभ राज्याला मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचे वेळापत्रकही तयार करण्यास सांगण्यात आले होते.

State Finance Department: राज्याचे वित्तीय आरोग्य कसे आहे हे आज वित्तमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाणून घेतले. वित्त सचिव डॉ. व्ही. कांदावेलू यांच्यासह वित्त खात्यातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर खाते प्रमुख मंत्रालयात झालेल्या या बैठकीत सहभागी झाले होते.
Goa Crime: ..अखेर अट्टल गुन्हेगार गजाआड! 100 घरफोड्यांमध्ये सहभाग; जुने गोवे पोलिसांची यशस्वी कामगिरी

केंद्र सरकारकडून वस्तू व सेवा करातील वाटा राज्याला मिळतो, त्याशिवाय इंधनावरील मूल्यवर्धित कर आणि मद्यावरील अबकारी कर मिळतो. त्याआधारे राज्यशकट हाकावे लागते. महसुलाचा बऱ्यापैकी ६२ टक्के वाटा हा वेतन व निवृत्ती वेतनावर खर्च होतो. त्यातच या महिन्यात बोनस व दिवाळीमुळे लवकर द्यावयाच्या वेतनामुळे सरकारी तिजोरीवर भार पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Politics
Seva Sankalp Campaign: 'सरकार तुमच्या दारी'; मुख्यमंत्र्यांनी बार्देशातील 200 नागरिकांच्या समस्या ऐकल्या, अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे आदेश
Goa Griha Aadhar Scheme: गोव्यातील महिलांसाठी खूशखबर! दिवाळीत वाढणार गृहआधार योजनेची रक्कम, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा VIDEO
Pramod Sawant Meeting Central Officials
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com