Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

state bank loan distribution: गेल्‍या पाच वर्षांत कृषी आणि त्‍यासंबंधित उपक्रमांसाठी २१,६७४ कोटी सूक्ष्‍म, लघू आणि मध्‍यम व्‍यवसायांसाठी (एमएसएमई) २०,९४३ कोटी आणि शैक्षणिक कर्जांसाठी ४८६ कोटी असे मिळून एकूण ४३,१०३ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले.
Goa state bank loan distribution
Goa state bank loan distributionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्‍यातील व्‍यावसायिक, ग्रामीण आणि सहकारी बँकांनी गेल्‍या पाच वर्षांत कृषी आणि त्‍यासंबंधित उपक्रमांसाठी २१,६७४ कोटी सूक्ष्‍म, लघू आणि मध्‍यम व्‍यवसायांसाठी (एमएसएमई) २०,९४३ कोटी आणि शैक्षणिक कर्जांसाठी ४८६ कोटी असे मिळून एकूण ४३,१०३ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले. त्‍यातील ‘एमएसएमई’ आणि शैक्षणिक कर्जाचे १८१.६७ कोटी थकित असल्‍याचे केंद्रीय अर्थ राज्‍यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्‍यसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून समोर आले आहे.

गोव्‍यासह सर्वच राज्‍यांमधील कृषी, ‘एमएसएमई’ला बळकटी देण्‍यासाठी तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी व्‍यावसायिक, ग्रामीण आणि सहकारी बँकांकडून कर्जांचे वितरण करण्‍यात येते.

Goa state bank loan distribution
Goa Assembly Winter Session 2026: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हडफडे अग्निकांडामुळे तापणार? 12 ते 16 जानेवारीपर्यंत चालणार कामकाज

२०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांच्‍या कालावधीत या तीन गोष्‍टींसाठी या बँकांनी गोमंतकीय जनतेला ४३,१०३ कोटी रुपयांच्‍या कर्जांचे वितरण केले. त्‍यात ‘एमएसएमई’ आणि शैक्षणिक कर्जासाठी देण्‍यात आलेल्‍या २१,६७४ कोटींपैकी १८१.६७ कोटी रुपये अजूनही थकित असल्‍याचे मंत्री चौधरी यांनी उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

कृषी संबंधित उपक्रमांसाठी दिलेले कर्ज (कोटींत)

वर्ष कर्ज

२०२०-२१ १,३७४

२०२१-२२ १,४७४

२०२२-२३ १,९०५

२०२३-२४ २,४२९

२०२४-२५ १४,४९२

Goa state bank loan distribution
Goa Fishing Boat Missing: सोमवारी निघाले, पण परतलेच नाहीत! काणकोणच्या समुद्रात मासेमारी बोट गायब; 4 मच्छिमारांचा जीव टांगणीला

बँकांनी दिलेले शैक्षणिक आणि थकित कर्ज

वर्ष दिलेले कर्ज थकित

२०२०-२१ ७० कोटी ०

२०२१-२२ ७६ कोटी ११ लाख

२०२२-२३ ९८ कोटी २ लाख

२०२३-२४ ११९ कोटी २५ लाख

२०२४-२५ १२३ कोटी २९ लाख

‘एमएसएमई’साठी दिलेले आणि थकित कर्ज

वर्ष दिलेले कर्ज थकित (कोटीत)

२०२०-२१ ३,१९४ ४४

२०२१-२२ २,९०४ ४७

२०२२-२३ ३,८८९ ५१

२०२३-२४ ४,६५३ १९

२०२४-२५ ६,३०३ २०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com