Goa IT Company: स्टार्टअप, आयटी कंपन्यांना मिळाला बुस्ट

Goa IT Company: सरकारचा पुढाकार : ‘माहिती तंत्रज्ञान’ने केला ‘जीसीसीआय’शी सामंजस्य करार
Goa IT Company
Goa IT CompanyDainik Gomantak
Published on
Updated on

Goa IT Company: अर्थपूर्ण संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण, मार्गदर्शन आणि सहकार्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी स्टार्टअप आणि माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स खात्यातर्फे गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीशी सामंजस्य करार करण्यात आला.

Goa IT Company
Fortified Rice: फॉर्टिफाईड तांदळावरून स्वस्त धान्य दुकानदार चिंताग्रस्त

यावेळी खात्याचे मंत्री रोहन खंवटे, गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, राल्फ डिसोझा, संजय आमोणकर, ललित सारस्वत, पी. अभिषेक आदी उपस्थित होते.

यावेळी धेंपो म्हणाले की, राज्यातील स्टार्टअप्स आणि आयटी कंपन्यांच्या वाढीला चालना देण्यासाठी सरकारने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. यावेळी पॅनेल चर्चा झाली. यात उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि गुंतवणूकदारांनी भाग घेतला.

Goa IT Company
Goa News: बेपत्ता झालेल्या 4 मुली सापडल्‍या निर्जनस्‍थळी

केनिलवर्थचे महाव्यवस्थापक अशोक तन्ना, डिसोझा ग्रुप ऑफ हॉटेल्सचे कार्लोस डिसोझा, साधना मुकुंदन, संचालक आणि महाव्यवस्थापक बोगमाळो बीच रिसॉर्ट सौरभ खन्ना, महाव्यवस्थापक द पार्क हॉटेल आणि पणजी इनचे संचालक जॅक सुखिजा उपस्थित होते.

पॅनेलच्या सदस्यांनी विविध विषयांवर प्रकाश टाकला ज्याद्वारे ते स्टार्टअप्ससह सहयोग करू शकतात आणि उद्योगाला भेडसावणाऱ्या समस्यांतून संधी शोधण्यासाठी मदत करतील.

स्टार्टअप आणि माहिती तंत्रज्ञान प्रोत्साहन विभाग गोवाचे सीईओ डी.एस. प्रशांत यांनी चर्चेचे सूत्रसंचालन केले. यानंतर, ७ स्टार्टअप्सनी त्यांची उत्पादने पॅनेलच्या सदस्यांसमोर मांडली, त्यानंतर स्पीड डेटिंग सत्र सुरू झाले.

गोव्याला भारताची सर्जनशील राजधानी (क्रिएटिव्ह कॅपिटल) बनवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. माझा विश्वास आहे की, नावीन्यपूर्ण आणि प्रस्थापित उद्योगांचे एकत्रीकरण ही गोव्यातील प्रगतीचे नवे दालन उघडण्याची गुरुकिल्ली आहे.

मी या मंचाच्या परिवर्तनीय शक्तीचा साक्षीदार होण्यास उत्सुक आहे; कारण ते आपल्या राज्यासाठी सहयोग, नावीन्य आणि समृद्धीच्या नवीन युगाची सुरवात करत आहे. - रोहन खंवटे, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com