Goa News: बेपत्ता झालेल्या 4 मुली सापडल्‍या निर्जनस्‍थळी

Goa News: कुडतरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत बुधवारी (ता.२५) सकाळपासून राहत्या घरातून बेपत्ता झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा माग काढत पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या पाचजणांना अटक केली.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: कुडतरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत बुधवारी (ता.२५) सकाळपासून राहत्या घरातून बेपत्ता झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा माग काढत पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या पाचजणांना अटक केली. ही कामगिरी पोलिसांनी मोठ्या शिताफीने पार पाडली.

Goa Crime
Babush Monserrate: संशयित बाबूश मोन्सेरांतविरुद्धच्या खटल्यात दोन साक्षीदारांना समन्स

या चार अल्पवयीन मुली हरवल्यानंतर त्यांच्या पालकांनी पोलिस तक्रार दाखल केली होती. त्‍यानुसार पोलिसांनी तातडीने लक्ष घालून तपास सुरू केला असता त्‍या नुवे येथे असल्याचे पोलिसांना आढळून आले. नंतर लगेच त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली व या मुलींना आपल्या ताब्यात घेतले. यावेळी मुलींसोबत ५ युवकही पोलिसांना आढळून आले. त्‍

यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देमेट्रियस फर्नांडिस (१८), कायमिक्स कुतिन्हो (१९), मर्विन कुतिन्हो (१८), डायगो फर्नांडिस (१९, सर्वजण रा. नुवे) व अझीम अहमद (२१, रा. फातोर्डा) अशी संशयितांची नावे आहेत.

मोबाईल स्‍वीच ऑफ, तरीही...

या मुलींना संशयितांनी नुवे येथील डोंगरावर निर्जनस्‍थळी नेले होते. सर्वांनी आपला मोबाईल स्वीच ऑफ केला होता. त्‍यामुळे मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला व मागोवा घेत हे ठिकाण गाठले. या मुलींशी अनैतिक प्रकार तर घडला नाही ना, याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी त्‍यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले आहे. त्‍याचा अहवाल येणे बाकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Custodial Assault Allegations
Goa Crime News
Porvorim POCSO Case
Fatorda Minor Boy Assault
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com