MLA Premendra Shet: नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करा!

प्रेमेंद्र शेट: ‘कोदाळ’ तळ्यातील गाळ उपसण्यास सुरुवात
Starting to pump the sediment from the 'Kodal' pond goa
Starting to pump the sediment from the 'Kodal' pond goaDainik Gomantak
Published on
Updated on

MLA Premendra Shet: आज नैसर्गिक जलस्रोत मानवनिर्मित प्रदूषणाच्या विळख्यात अडकली असून जलस्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य अपेक्षित आहे. नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन ही काळाची गरज आहे, असे मत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी व्यक्त केले. गावागावातील जलस्रोतांचा विकास करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे.

Starting to pump the sediment from the 'Kodal' pond goa
Sand Extraction: ‘झुआरी’ काठ उद्ध्‍वस्‍त करण्याचा घाट!

असे आमदार श्री. शेट यांनी सांगितले. कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रातील ''कोदाळ'' तळ्यातील गाळ उपसण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर आमदार श्री. शेट बोलत होते.

सोमवारी (ता.११) श्रीफळ वाढवून त्यांच्याच हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, कारापूर-सर्वणचे सरपंच दत्तप्रसाद खारकांडे, उपसरपंच तन्वी सावंत, पंच लक्ष्मण गुरव, दिव्या नाईक, माजी सरपंच बाळकृष्ण सावईकर, जलस्रोत खात्याचे अभियंते श्री. भंडारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

‘कोदाळ’ तळ्याचा विकास व्हावा. यासाठी तत्कालीन आमदार स्व. अनंत शेट हे प्रयत्नशील होते. असे सरपंच श्री. खारकांडे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी वरदान : कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रातील नैसर्गिक जलस्रोत असलेले ''कोदाळ'' तळे स्थानिक शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. या तळ्यातील पाण्यावर कारापूर परिसरातील शेती आणि कुळागरे अवलंबून आहेत. या तळ्याचा विकास झाल्यानंतर परिसरातील शेती-कुळागरांसाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे, असा शेतकऱ्यांचा दावा आहे.

Starting to pump the sediment from the 'Kodal' pond goa
Crime News: मारहाणप्रकरणी संशयिताची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com