गोमॅको समोरील स्टॉल हटवण्यास सुरूवात

स्टॉल पाडले जाऊ नयेत म्हणून या स्टॉलधारकांनी बुधवारी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचीही भेट घेतली होती.
गोमॅको समोर पोलीस बंदोबस्तात कारवाई सुुरु
गोमॅको समोर पोलीस बंदोबस्तात कारवाई सुुरुDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) इस्पितळाच्या बाहेर असलेले गाडे (Stall) आज पहाटेपासून हटविण्यास सुरुवात झाली. सरकारी जमिनीवर (Government Property) हे गाडे बांधले गेल्यामुळे ते हटवावेत अशी नोटीस तिसवाडीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली होती. (Stalls on government land in front of GMC began to be removed)

हे गाडे पाडले जाऊ नयेत म्हणून या गाडेधारकांनी बुधवारी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचीही भेट घेतली होती. या गाडेधारकांना पैकी बहुतांश जण हे सातआंद्रे व सांताक्रुझ विधानसभा मतदारसंघातील आहेत. यामुळे या गाडेवाल्यांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, आमदार आंतोनिओ फर्नांडिस, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक, भाजपचे स्थानिक नेते रामराव वाघ, मर्विन गोन्साल्विस हेही गेले होते.

गोमॅको समोर पोलीस बंदोबस्तात कारवाई सुुरु
Goa: संचारबंदी झुगारून बाजारपेठेत वर्दळ

या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी या गाड्यांचे उचित जागी पुनर्वसन करण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे या शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी सांगितले होते. हे गाडे हटवण्याची कारवाईत आज सकाळी लवकर करण्यात आली. यापैकी बहुतांश गाडे त्यावेळी बंद होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com