डिचोली : राज्यस्तरीय (Goa) संचारबंदीचा (Curfew) कालावधी वाढवला असताना आणि दुसऱ्या बाजूने ‘डेल्टा प्लस’ व्हेरींयंट (Delta Plus Variant) संसर्गाचा धोका असतानाही डिचोली (Bicholim) बाजारात दिवसेंदिवस विक्रेते आणि ग्राहकांची वर्दळ वाढत आहे. साप्ताहिक बाजारावर मर्यादा असतानाही आज बुधवारी बाजारात वर्दळ वाढली होती. (While there is a curfew in Goa Bicholim market is crowded with vendors and customers)
बाजारातील वर्दळ पाहता, साप्ताहिक बाजार भरल्याचे जाणवत होते. मागील आठवड्यातील बुधवारी डिचोलीत वटपौर्णिमेचा बाजार भरला होता. त्यादिवशीही बाजार भरल्यागत वाटत होते. सामाजिक नियम पाळून विक्रेते व्यवसाय करीत असले, तरी ग्राहक विक्रेते आणि दुकानांसमोर गर्दी करीत आहे. सरकारने संचारबंदी वाढवली, तरी आम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही, अशाच भ्रमात काही ग्राहक बाजारात वावरत आहेत. त्यामुळे बऱ्याचदा बाजारात सामाजिक नियमांचे तीनतेरा वाजत असल्याचे दिसून येते.
येत्या 5 जुलै रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी वाढवली, तरी संचारबंदीतील शिथिलतेमुळे डिचोली बाजारातील बहुतेक दुकाने आदी सर्व व्यवहार मागील आठ-दहा दिवसांपासून हळूहळू पूर्ववत झाले आहेत. एरवी संचारबंदी काळात आठवड्यापूर्वी सुनासुना वाटणाऱ्या डिचोली बाजारात सध्या ग्राहकांची वर्दळही वाढत असल्याचे जाणवत आहे. बाजार संकुलातील फळ-भाजी मार्केटही मागील आठवड्यापासून सुरू झाले आहे. संचारबंदी असताना जे कोण सामाजिक नियम मोडतात. त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. संचारबंदी वाढवण्यापेक्षा नियमांची कडकपणे अंमलबजावणी करा, संचारबंदीच्या नावाखाली सामान्य जनतेला वेठीस धरता कामा नये, असा सूर नागरिकांमधून सध्या व्यक्त होत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.