Panaji : वीजवाहिनी तुटल्याने सांतिनेज भागात तीन तासांपासून बत्तीगुल; नागरिक संतापले

मिरामार, टोंका, सांतिनेज या परिसरातील विज पुरवठा खंडित
Power outages in Ponda
Power outages in PondaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी शहरातील भूमिगत वीजवाहिनी तुटल्याने मिरामार, टोंका, सांतिनेज या भागात विज पुरवठा खंडीत झाला आहे. तीन तासापासून अधिक वेळ हा विज पुरवठा सुरळीत न झाल्याने नागरीकातून संताप व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पणजी शहरात रस्ते कमी अन् खड्डे अधिक अशी स्थिती आहे. यामुळे वाहतूक समस्या वाढत असताना आता विज पुरवठ्याअभावी नागरीक हैराण आहेत.

(St Inez Miramar and Tonca areas have experienced power outages)

Power outages in Ponda
Vasco : हल्लेखोर पोलीसांना अटक करा; गजानन सावंत हल्ला प्रकरणी अ‍ॅडव्होकेट असोसिएशन आक्रमक

मिळालेल्या माहितीनुसार राजधानी पणजी सध्या खड्डेमय आहे. स्मार्ट सिटीच्या गोंडस नावाखाली मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. मात्र नागरीकांच्या वाढत असलेल्या समस्यांकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण गेल्या दोन ते तीन महिन्यापासून जमीन खोदकामामुळे पणजी शहरात वाहतूक समस्येमूळे पणजीकर हैराण झाले आहेत. यातच आता विज पुरवठा देखील खंडीत होऊ लागल्याने नागरीकांचा आज पारा चढल्याचे चित्र आहे.

Power outages in Ponda
Panjim : पणजी येथील हार्डवेअर गोदामाला आग; अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन तासांपासून पणजी येथील मिरामार, टोंका, सांतिनेज या परिसरात विज पुरवठा खंडित झाला आहे. याबाबत प्रशासनाने दखल घेत तातडीने दुरुस्थी करणे अपेक्षित असताना या कडे सरळ सरळ दुर्लक्ष झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वीज केबल खराब झाल्याने विजपुरवठा खंडित झाला असल्याचे स्पष्ट झाले असले तरी नागरीकांनी आणखी कोणत्या कोणत्या समस्यांना तोंड द्यावे ते एकदा स्पष्टच सांगावे असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com