St Estevam Accident: अखेर ती कार जुने गोवे पोलिसांना सापडली! बेपत्ता युवकाचे शोधकार्य अजूनही सुरूच

St Estevam Tragedy: पोलिसांनी कार आणि संशयितांना ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस देऊन सोडण्यात आले
St Estevam Tragedy: पोलिसांनी कार आणि संशयितांना ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस देऊन सोडण्यात आले
St Estevam Incident|CarDainik Gomantak
Published on
Updated on

तिसवाडी: टोळटो-सांतइस्तेव्ह अपघात प्रकरणात जुने गोवे पोलिसांच्या हाती पाठलाग करणारी कार लागली आहे. हुबळी-कर्नाटक येथे ती कार असल्याची माहिती माहिती मिळाल्यानंतर तेथे पाठलाग करून पोलिसांनी कार आणि संशयितांना ताब्यात घेतले. यासीम गौस (३२, कुंद्री-बेळगाव) आणि सलमान गौस (२८, रुक्मिणीनगर-बेळगाव) अशी त्‍यांची नावे आहेत. त्‍यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस देऊन सध्‍या सोडण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी दिली.

अपघातात बेपत्ता झालेला बशुदेव भंडारी (२२) याचा भाऊ बलराम भंडारी (बरूच-गुजरात) याची तक्रार भारतीय दंड संहितेच्या कलम ३५१(३), १२६(२) आर/डब्लू ३(५) अंतर्गत तक्रार नोंद करण्यात आली. तत्पूर्वी सांतइस्तेव्ह येथे झालेल्या अपघाताची नोंद जुने पोलिसांनी केली होती. बशुदेवच्या मैत्रिणीने वर्णन केल्यानुसार कारचा शोध सीसीटीव्ही फुटेजद्वारे सुरू झाला होता. यासाठी पोलिसांनी चार पथक गठित करण्‍यात आली होती.

१ ते ७ सप्टेंबरदरम्यान तपास केल्यानंतर अखेर संशयित कार (जीए ०७ ई ५३९५) दोन पथके बेळगाव आणि हुबळी येथे रवाना करण्‍यात आली. अखेर काल ६ सप्टेंबर रोजी कार हुबळी येथे सापडली.

पोलिसांनी कार ताब्यात घेऊन कारमालकाची चौकशी सुरू केली असून, दोन्ही संशयितांना चौकशीसाठी जुने गोवे पोलिस ठाण्यात आणले आहे.

वास्को येथील या कारची बेळगावच्या एका व्‍यक्तीला विक्री करण्‍यात आली होती. ३१ ऑगस्ट रोजी कारमालकाचे मित्र यासीर आणि सलमान हे गोव्यात कॅसिनोत खेळण्यासाठी आले होते. मध्यरात्री परताना बुशदेव आणि संशयितांच्या कारचा किरकोळ अपघात झाला. त्यानंतर बशुदेवने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. संशयितांनी त्‍यांचा पाठलाग केला होता.

St Estevam Tragedy: पोलिसांनी कार आणि संशयितांना ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस देऊन सोडण्यात आले
St Estevam Accident: अजूनही सांतइस्तेव्ह नदीत शोधकार्य सुरूच; मांडवी येथील अज्ञात मृतदेहावरून चर्चेला उधाण

बेपत्ता युवकाचा अजून थांगपत्ता नाहीच

बेपत्ता युवक बशुदेव बुडाल्‍याचा संशय असल्‍यामुळे तपासकार्य जोरात राबविले, परंतु अद्याप मृतदेह सापडलेला नाही. अजूनही शोधकार्य सुरूच आहे. ३१ ऑगस्‍टच्‍या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कार कुंभारजुवे नदीत गेली होती. त्यातील युवतीने पोहून किनारा गाठला होता तर बशुदेव बेपत्ता झाला होता. युवतीने अशी माहिती पोलिसांना दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com