St Estevam Accident: बाशुदेव कडे होते रोख '१ लाख' रुपये? २३ सप्टेंबरनंतरच ‘ती’ जबाब द्यायला गोव्यात येणार

St Estevam Tragedy: बाशुदेवला भेटलेली शेवटची व्यक्ती या नात्याने त्या युवतीचा पुन्हा सविस्तर जबाब पोलिसांना हवा आहे
St Estevam Tragedy: बाशुदेवला भेटलेली शेवटची व्यक्ती या नात्याने त्या युवतीचा पुन्हा सविस्तर जबाब पोलिसांना हवा आहे
Crime|SuspenseCanva
Published on
Updated on

St Estevam Incident

पणजी: सांतइस्तेव येथे ३१ ऑगस्टच्‍या मध्यरात्री कुंभारजुवा नदीत कार बुडाल्यानंतर बेपत्ता झालेल्या बाशुदेव भंडारी याचा शोध लावण्यासाठी त्या दुर्घटनेतून वाचलेल्या युवतीचा जबाब घेण्याकरिता आता पोलिसांना २३ सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्या युवतीने आपल्या वकिलामार्फत पोलिसांना दिलेल्या उत्तरात आपण २३ सप्टेंबरपर्यंत गोव्यात परतू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

साखळी येथील व्यवस्थापन शास्त्र संस्थेत ती युवती जुलैपासून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकत आहे. तिच्यासोबतच्या प्रेमाचा तिसरा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी बाशुदेव हा तरुण अहमदाबाद येथून २६ ऑगस्‍टला गोव्यात आला होता. त्या संस्थेतील अन्य दोन परप्रांतीय विद्यार्थ्यांसोबत बाशुदेव आणि त्या युवतीने ३१ रोजीच्या रात्री जेवणही घेतले होते.

त्यानंतर झालेल्या या दुर्घटनेत बाशुदेव बेपत्ता झाला आहे. त्याला भेटलेली शेवटची व्यक्ती या नात्याने त्या युवतीचा पुन्हा सविस्तर जबाब पोलिसांना हवा आहे. यासाठी तिला समन्स बजाविण्यात आले होते. त्याला उत्तर देताना तिने २३ सप्टेंबरनंतरच आपण गोव्यात परतू शकते असे स्पष्ट केले आहे.

बाशुदेव याचे वडील नारायण आणि बंधू बलराम हे सध्या गोव्यात आहेत. जुने गोवे पोलिस स्‍थानकात दररोज जाऊन ते तपासकामाचा पाठपुरावा करत आहेत. उद्या मंगळवारी दुपारी ते पोलिस महासंचालक आलोक कुमार यांचीही भेट घेणार आहेत.

दरम्यान, या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यावर पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत भर दिला आहे. बाशुदेव नदीत बुडाल्याची कोणतीही चिन्हे नसल्याकारणाने तो नदी बाहेर आला तर कुठे गेला असावा, याची शक्याशक्यता पडताळून पाहण्यात येत आहे.

St Estevam Tragedy: बाशुदेवला भेटलेली शेवटची व्यक्ती या नात्याने त्या युवतीचा पुन्हा सविस्तर जबाब पोलिसांना हवा आहे
St Estevam Accident: दुसऱ्या मित्राशी '२० मिनिटे' काय संभाषण केले? सांतइस्तेव प्रकरणात पोलिसांचा संशय बळावला

सोबत आणले होते १ लाख रुपये

बाशुदेव गोव्यात येताना रोख एक लाख रुपये घेऊन आला होता. चार दिवसांच्या खर्चानंतर त्याच्याकडे किमान पन्नासेक हजार रुपये शिल्लक राहिले असावेत. शिवाय त्याच्याकडे दोन डेबिट कार्ड व दोन क्रेडिट कार्ड होती. त्या कार्डांचाही त्याने अद्याप वापर केला नसल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. त्‍यामुळे केवळ सोबत असलेल्या पन्नास हजार रुपयांच्या आधारे तो किती दूरवर जाऊ शकेल याविषयी शंका घेतली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com