St Estevam Accident: दुसऱ्या मित्राशी '२० मिनिटे' काय संभाषण केले? सांतइस्तेव प्रकरणात पोलिसांचा संशय बळावला

St Estevam Tragedy: बुडालेल्या कारमधील बाशुदेव भंडारी हा कारसोबत बुडालाच नाही असे गृहित धरून आता पोलिस तपासकाम सुरू झाले आहे
St Estevam Tragedy: बुडालेल्या कारमधील बाशुदेव भंडारी हा कारसोबत बुडालाच नाही असे गृहित धरून आता पोलिस तपासकाम सुरू झाले आहे
investigation|FingerprintsCanva
Published on
Updated on

St Estevam Incident

पणजी: सांतइस्तेव येथे बुडालेल्या कारमधील बाशुदेव भंडारी हा कारसोबत बुडालाच नाही, असे गृहित धरून आता पोलिस तपासकाम सुरू झाले आहे. या दुर्घटनेतून वाचलेल्या युवतीने मदत मागण्यासाठी गेलेल्या घरातील मोबाईलवरून आपल्या दुसऱ्या मित्राशी २० मिनिटे काय संभाषण केले, यावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. बाशुदेव याचे पिता नारायण यांनी युवती आणि तिच्या कुटुंबीयांवर आपला पुत्र गायब केल्याचा आरोप यापूर्वीच केला आहे.

साखळी ते माशेलदरम्यान बाशुदेव आणि ती युवती जेवणासाठी थांबली असता, तिने आपल्या दोन मित्रांना जेवणासाठी पाचारण केले होते. बाशुदेवला वाचविण्यासाठी त्या घरातील लोकांना नदीपर्यंत नेण्याऐवजी त्यापैकी एका मित्राशी ती बोलत राहिल्याने तिच्यावरचा संशय बळावला आहे. येत्या चार दिवसांत जुने गोवे पोलिसांना तपासकामास सहकार्य करण्यासाठी तिने उपस्थित राहावे, असा निरोप पोलिसांनी तिला दिला आहे. ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर अन्य एका कारने पाठलाग केल्याने बाशुदेवने कार सांतइस्तेव फेरी धक्‍क्याकडे वळविली व फेरीबोट नसल्याने ती कार थेट पाण्यात गेल्याचे सांगण्यात येत असले तरी पोलिसांनी सर्व बाजूंनी तपासकाम सुरू केले आहे.

नारायण आणि त्यांचा मोठे सुपुत्र बलराम यांनी आज दिवसभर त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात केवळ वाहने येता-जाताना त्यांना दिसली. त्या वाहनांमध्ये बसून बाशुदेव निघून गेला की नाही, हे त्यांना त्यावरून समजलेले नाही.

युवतीला चौकशीसाठी पाचारण

या युवतीने आपल्या आईला या अपघाताविषयी न सांगता मित्राचा मोबाईल क्रमांक मागितला. बाशुदेव हा तिचा प्रियकर आहे आणि प्रेमसंबंधाचा तिसरा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी तो गोव्यात आला, तर मग आईच्या मोबाईलमध्ये त्या दुसऱ्या मित्राचा क्रमांक नोंद कसा, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत नारायण यांनी पोलिसांशी चर्चा केल्यावर त्या युवतीला चौकशीसाठी बोलावल्याचे सांगण्यात आले.

घटनेला वेगळे वळण

या प्रकरणातील युवतीने त्या रात्री मदत मागितली, त्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ती मदत मागण्यासाठी त्या घराकडे जाताना वाटेत एकदा पडली.

त्या घरातील लोकांना बाशुदेवचे वडील आणि भावाने त्या रात्रीविषयी विचारले असता त्यांना धक्कादायक माहिती मिळाली.

त्यांना त्या मुलीने आपल्या गाडीला अपघात झाल्याचे सांगितले आणि घरी संपर्क साधण्यासाठी मोबाईल मागितला. ती आईशी बोलली.

St Estevam Tragedy: बुडालेल्या कारमधील बाशुदेव भंडारी हा कारसोबत बुडालाच नाही असे गृहित धरून आता पोलिस तपासकाम सुरू झाले आहे
St Estevam Accident: मग फोन उचलला 'कुणी'? पोलिसांसमोर गूढ उकलण्याचे आव्हान

मी वसतीगृहातच असून मोबाईल नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे माझ्या मित्राचा क्रमांक या मोबाईलवर पाठवावा, असे तिने आईला सांगितले.

आईने तसे केल्यावर त्या घरातील व्यक्तीच्या मोबाईलवरूनच त्या मित्राशी ती दीर्घकाळ बोलत होती.

बाशुदेव पाण्यात बुडाला होता, तर तिने त्या घरातील व्यक्तींकडून मदत का घेतली नाही?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com