'बेपत्ता बाशुदेव पाच दिवसाने सापडेल'; St Estevam प्रकरणात पुरोहिताचा अजब दावा

St Estevam Tragedy: भंडारी कुटुंबीयांनी नेपाळमधील राजदूत नवीन श्रीवास्तव यांची भेट घेतली आणि त्यांना बाशुदेव बेपत्ता होण्याची माहिती दिली
St Estevam Tragedy: भंडारी कुटुंबीयांनी नेपाळमधील राजदूत नवीन श्रीवास्तव यांची भेट घेतली आणि त्यांना बाशुदेव बेपत्ता होण्याची माहिती दिली
investigation|FingerprintsCanva
Published on
Updated on

St Estevam Incident

पणजी: सांतइस्तेव येथील फेरी धक्क्यावर कार बुडाल्यानंतर बेपत्ता झालेला बाशुदेव भंडारी याचा विषय आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचला आहे. बाशुदेव यांच्या आत्याचे पती सूर्या भुसाल यांनी नेपाळमधील भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव यांची भेट घेतली आणि त्यांना बाशुदेव याच्या गूढपणे बेपत्ता होण्याची माहिती दिली.

भंडारी कुटुंबीय हे मूळचे नेपाळमधील आहेत. बाशुदेवचे पिता नारायण हेव्यवसायाच्या निमित्ताने भडोच (गुजरात) येथे स्थायिक झाले. बाशुदेवचे वडीलबंधू बलराम हे पोखरा येथील हॉटेल व्यावसायिक आहेत.

पुत्रविरहामुळे देवालाही साकडे

बाशुदेवचे काय झाले असावे, या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याने गेले १९ दिवस गोव्यात तळ ठोकलेले त्यांचे वडील नारायण यांनी अखेर देवालाच शरण जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सांतइस्तेव परिसरातील एका मंदिरात पूजाही केली. त्यांना तेथील पुरोहिताने २५ रोजी बाशुदेव सापडेल, असे सांगितले आहे. त्यामुळे आता निदान २५ रोजी तरी बाशुदेव सापडेल, अशी आपल्या मनाची समजूत ते घालत आहेत.

St Estevam Tragedy: भंडारी कुटुंबीयांनी नेपाळमधील राजदूत नवीन श्रीवास्तव यांची भेट घेतली आणि त्यांना बाशुदेव बेपत्ता होण्याची माहिती दिली
St Estevam Accident: बाशुदेव कडे होते रोख '१ लाख' रुपये? २३ सप्टेंबरनंतरच ‘ती’ जबाब द्यायला गोव्यात येणार

केंद्राकडेही मांडणार बाशुदेवचा विषय

बाशुदेवचे नातेवाईक भूसाल हे नेपाळ-भारत मनुष्यबळ विकास व मैत्री संघटनेचे अध्यक्ष आहेत. भारत सरकारचे काठमांडूतील मित्र, असे त्यांना ओळखण्यात येते. नेपाळमधील चीनी हस्तक्षेप रोखण्यात भूसाल यांची भूमिका महत्त्वाची असते. त्‍यामुळे पंतप्रधान कार्यालय तसेच केंद्रीय गृह मंत्रालयात त्यांची बऱ्यापैकी ओळख आहे. ते येत्या आठवड्यात दिल्लीला जाणार असून तेथे ते बाशुदेव बेपत्ता प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com