Srinivas Naik Firing Case: गोळीबार प्रकरणाच्या उलगड्याकडे पोलिस तपासाची वाटचाल; महत्त्वाचा सुगावा हाती? दोन विशेष पथके मुंबईत तळ ठोकून

Goa Police Srinivas Naik Investigation: श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेला चार दिवस उलटले असून या प्रकरणाचा तपास पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने आणि वेगाने सुरू ठेवला आहे.
Goa Police Srinivas Naik Investigation
Srinivas Naik Firing CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कॅसिनो ‘निओ मॅजेस्टिक’चे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबार प्रकरणाच्या तपासात अद्याप कोणतेही ठोस धागेदोरे हाती लागले नसल्याचे सांगितले जात असले, तरी सूत्रांच्या दाव्यानुसार पोलिसांच्या हाती या प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाचा सुगावा लागल्याचे समजते. मात्र, तपासाच्या गोपनीयतेमुळे पोलिस प्रशासनाकडून यावर कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेला चार दिवस उलटले असून या प्रकरणाचा तपास पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने आणि वेगाने सुरू ठेवला आहे. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी या प्रकरणाच्या तपासाविषयी माहिती दिली. या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू आहे. मात्र, तपासात आतापर्यंत काय हाती आले किंवा कोणाला ताब्यात घेतले यावर लगेच भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे सांगत त्यांनी अधिकृत बोलणे टाळले.

Goa Police Srinivas Naik Investigation
Goa Cyber Crime: गोव्यात गुन्हेगारी वाढली, पोलिस करतात काय? विरोधकांचा खडा सवाल, सायबर गुन्ह्यांत 272 टक्के वाढीचा दावा

नायक यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने तात्काळ विविध पथके तयार करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि स्थानिक खबऱ्यांच्या माध्यमातून गुन्ह्याचा उलगडा करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. तपास यंत्रणा या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करत असून, लवकरच या गुन्ह्याचा छडा लावला जाईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिस दलाने कंबर कसली आहे. सध्या पोलिसांची दोन विशेष पथके मुंबईत तळ ठोकून आहेत, तर अन्य काही पथके इतर संशयास्पद ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. तपासाचे सर्व संभाव्य मार्ग आणि तांत्रिक पुरावे पडताळून पाहिले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com