

Sri Lanka Under-19 Cricket Scandal: श्रीलंका क्रिकेट सध्या एका अत्यंत लाजिरवाण्या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा टीकेचे धनी ठरले. श्रीलंकेच्या अंडर-19 संघातील दोन खेळाडूंनी हॉटेलमध्ये केलेल्या अश्लील कृत्यामुळे संपूर्ण देशाच्या क्रिकेट प्रतिमेला मोठा धक्का बसला. कोलंबोमधील नाराहेनपिटा येथील एका हॉटेलमध्ये हा संतापजनक प्रकार घडला.
हॉटेलमधील महिलांनी (Womens) तक्रार केली की, त्या अंघोळ करत असताना कोणीतरी गुपचूप मोबाईल फोनद्वारे त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करत आहे. या तक्रारीची दखल घेत तातडीने तपास केला असता, श्रीलंकेच्या अंडर-19 क्रिकेट संघातील दोन खेळाडू यामध्ये दोषी आढळले. या घटनेमुळे सोशल मीडियावर श्रीलंकेच्या क्रिकेट संस्कृतीवर सडकून टीका केली जात आहे.
या गंभीर प्रकरणानंतर स्थानिक पोलिसांनी (Police) तात्काळ कारवाई करत दोन्ही खेळाडूंना अटक केली. अटकेनंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले, जिथे प्रत्येकी 5 लाख श्रीलंकाई रुपयांच्या खाजगी जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. कोलंबो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तरी हे व्हिडिओ कोठेही शेअर करण्यात आलेले नाहीत, ही एक दिलासादायक बाब आहे. मात्र, या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता पोलीस अद्याप तपास करत आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 मे रोजी होणार असून सध्या उपलब्ध असलेले सर्व पुरावे या दोन खेळाडूंविरुद्ध असल्याचे समोर येत आहे.
श्रीलंका क्रिकेटसाठी वादांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी श्रीलंकेच्या महिला क्रिकेटमध्ये 'सेक्सुअल फेवर' मागितल्याचे आरोप झाले होते, ज्यामुळे बोर्डाची मोठी नाचक्की झाली होती. तसेच श्रीलंकेच्या एका स्टार खेळाडूला ऑस्ट्रेलियात बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सध्या श्रीलंका क्रिकेट बोर्डाची स्थिती अत्यंत डळमळीत असून सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे सध्या क्रीडा मंत्रालय श्रीलंकाई क्रिकेटचा कारभार सांभाळत आहे. अशा कठीण काळात घडलेल्या या नव्या प्रकरणामुळे क्रीडा मंत्रालय या दोन तरुण खेळाडूंवर कठोर कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.