गोव्यात कोरोना भीती कायम; 153 नवे रुग्ण

सक्रिय बाधितांची संख्या 1,074 तर पॉझिटिव्हिटी रेट 12.71
Covid-19
Covid-19Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यात गेल्या महिन्याभरापासून कोविड बाधितांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातच आज तब्बल 153 नव्या बाधितांची भर पडली. त्यामुळे कोविडविषयी भीती निर्माण झाली आहे. राज्यात एकूण बाधितांची संख्या 1074 झाली आहे. तर संक्रमण दर (पॉझिटिव्हिटी रेट) 12.71 वर पोहोचला आहे, ही राज्याच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब आहे. (spread of corona patients in Goa is not stop )

Covid-19
लग्नाला कुंडली बघतो तशी 'आरोग्य कुंडली' वर्षातून एकदातरी बघावी : मुख्यमंत्री

आज झालेल्या 1,203 संशयितांच्या चाचण्यांपैकी 153 नवे कोविड बाधित सापडले आहेत. विशेष म्हणजे, आज 112 जण कोविडमधून बरे झाले आहेत. राज्यात एकूण सक्रिय बधितांची संख्या 1,074 वर गेली आहे. राज्यात आतापर्यंत 2,49,002 नागरिकांना कोविडची बाधा झाली. यापैकी 2,44,090 लोक पूर्णपणे बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 98.03 टक्के आहे.

Covid-19
कोकण रेल्वे पोलिसांनी मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

किनारे खचण्याची कारणे शोधण्यासाठी 'एनआयओ'कडून अभ्यास

बदलत्या हवामानाचा परिणाम दर्यातील लाटांवरही झालेला असून त्यांचा प्रवाह बदलू लागला आहे. याचा विपरीत परिणाम गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर होऊ लागला असून किनारपट्टी मोठ्या प्रमाणावर खचू लागली आहे.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी आज याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. किनाऱ्यांची ही धूप का होते आणि ती थांबविण्यासाठी कोणते उपाय घेता येणे शक्य आहेत याचा एनआयओ संस्थेकडून अभ्यास करून घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com