Goa Shigmotsav: मठग्राम दुमदुमले

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : पौराणिक कथांवर आधारित चित्ररथ ठरले सर्वांचे आकर्षण
Goa Shigmotsav
Goa ShigmotsavDainik Gomantak

मडगाव शिगमोत्सव समिती, मडगाव नगरपालिका व गोवा पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिगमोत्सव उत्सवाला मडगावात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मडगावसह सासष्टीतील वेगवेगळ्या भागातून शिगमोत्सवाला आलेल्या नागरिकांचे रामजन्मभूमी प्रवेशद्वारासह रोमटामेळ, पौराणिक व ऐतिहासिक कथांवर आधारित चित्ररथ आकर्षण ठरले. ‘ओस्सय ओस्सय’च्या गजरात अवघे मठग्राम दुमदुमून गेले.

मडगावमधील शिगमोत्सवाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार उल्हास तुयेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत तसेच माजी आमदार दामू नाईक, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

सायंकाळी सुरवातीला नगरपालिकेच्या चौकात वेशभूषा स्पर्धा व सुवारी वादनाचा कार्यक्रम झाला. ही स्पर्धा रात्री 8 वाजता संपली. नंतर होली स्पिरीट चर्च चौकातून रोमटामेळ व चित्ररथांना सुरवात झाली. मुख्यमंत्र्यांहस्ते दोन पत्रकारांसह पाच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

लोकांनी लुटला शिगमोत्सवाचा आनंद

होली स्पिरीट चर्च ते मडगाव नगरापालिकेपर्यंतच्या सुमारे दोन किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा राहून लोकांनी शिगमोत्सवाचा आनंद लुटला. दुपारपासूनच नगरपालिका परिसरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्यांना चांगले गिऱ्हाईक मिळाले.

नगरपालिका चौकात लोकांना बसण्यासाठी गॅलरीची व्यवस्था केल्याने लोकांना रोमटामेळ व चित्ररथांचा आनंद अधिक चांगला पद्धतीने उपभोगता आला. रात्री उशीरापर्यंत चित्ररथ मिरवणूक चालू होती.

Goa Shigmotsav
Goa Congress: क्राईम ब्रँचने लोबोंची चौकशी करावी

‘आयएसएल’मुळे पोलिसांवर ताण

शिगमोत्सव मिरवणुकीमुळे आज सकाळपासून मडगावात वाहतुकीची कोंडी पाहण्यास मिळाली. नगरपालिकेला वळसा घालून स्टेट बॅंकेकडे जाणारा रस्ता बंद केल्याने वाहतुकीला अडथळा झाला.

रेल्वे उड्डाण पूल ते कोलवा जंक्शनपर्यंतच्या रस्त्यावर वाहने धीम्या गतीने जात होती. तशातच आयएसएल स्पर्धेच्या फातोर्डा स्टेडियमवरील अंतिम सामन्यामुळे पोलिसांना वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे कठीणच झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com