Bori News : शब्दांतून भावनांचा उत्स्फूर्त उद्रेक म्हणजे कविता : दीपा मिरिंगकर

Bori News : विविध संस्थांतर्फे फोंड्यात जागतिक कवितादिन उत्साहात
Goa
GoaDainik Gomantak

Bori News :

बोरी, शब्दाच्या माध्यमातून होणारा रसरशीत भावनांचा उस्‍फुर्त उद्रेक म्हणजे कविता. जगभराच्या लाखो प्रसिध्द आणि अप्रसिध्द कवींसाठी युनेस्कोने २१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय कवितादिन म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला.

याची सुरुवात १९९९ पासून सुरू झाली, असे प्रतिपादन प्रसिध्द कवयित्री दीपा मिरिंगकर यांनी केले.

जागतिक कवितादिनानिमित्त गोमंतक साहित्य सेवक मंडळ, प्रागतिक विचार मंच गोवा आणि प्रोबस क्बल हिल टाऊन फोंडा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मिरिंगकर बोलत होत्या.

याप्रसंगी व्यासपीठावर गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष जयवंत आडपईकर, प्रोबस क्लबचे उपाध्यक्ष अविनाश रामनाथकर, मनोहर तिळवे, चित्रा क्षीरसागर, माधुरी शेणवी उसगावकर उपस्थित होत्या.

दीपा मिरिंगकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी रमेश वंसकर यांचे वैश्‍विक कवितादिनाबद्दल भाषण झाले. अविनाश रामनाथकर यांनी स्वागत केले.

माधुरी शेणवी उसगावकर यांनी सूत्रसंचालन केले. मनोहर तिळवे, यशवंत तळावलीकर, नरहरी नाईक, दादू उसगावकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर जयवंत आडपईकर यांनी आभार मानले.

Goa
Goa News : विदेशातील काजूवर आयात शुल्क वाढवा! बागायतदारांची मागणी

त्यानंतर झालेल्या कविसंमेलनात दीपा मिरिंगकर, विनोद नाईक, कविता आमोणकर, रेश्‍मा झारापकर, प्रकाश क्षीरसागर, माधुरी शेणवी उसगावकर, चित्रा क्षीरसागर आदींनी आपल्या कविता सादर केल्या. यावेळी नारायण नावती, नरहरी नाईक, अशोक तरळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com