Goa News : विदेशातील काजूवर आयात शुल्क वाढवा! बागायतदारांची मागणी

Goa News : २०० रुपये हमीभाव देण्याची मागणी
 Cashew
Cashew Dainik Gomantak

Goa News :

पणजी, राज्यात येणारे पर्यटक हे मोठ्या प्रमाणात राज्यातून काजू विकत घेत असतात. या पर्यटकांना गोव्यातील काजूची अपेक्षा असते. परंतु अनेक विक्रेते आफ्रिका तसेच परदेशातून आणलेले काजू विक्री करतात.

परदेशी काजूंच्या आयातीमुळे राज्यातील राज्यातील काजूला योग्य भाव मिळत नसल्याने. परदेशातून येणाऱ्या काजूवरील आयात शुल्कात वाढ करण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे.

सध्याच्या काळात १११ रूपये प्रती किलो काजूला दर मिळत आहे. परंतु या काजू शेतकऱ्यांना परवडणारा नाही. काजूच्या सफाईसाठी, काजू गोळा करण्यासाठी लागणारे मजूर, आस्मानी संकटे तसेच काजूला रोटो लागणे अशा प्रकारांमुळे काजू शेतकऱ्यांना अनेक संकटांना समोरे जावे लागते. मागील वर्षी राज्य सरकारने काजूला १५० रूपये प्रतिकिलो हमीभाव जाहीर केला होता.

 Cashew
Construction In Goa: बंद ठेवलेले बांधकाम सुरू करण्‍यासाठी कोटींचा प्रस्‍ताव

यावेळी आचारसंहिता लागू झाल्याने हमीभाव जाहीर करता येत नाही.गेल्या काही वर्षांपासून काजू उत्पादक शेतकरी विदेशातून येणाऱ्या काजूमुळे संकटात सापडले आहेत. त्यांना न्याय मिळावा,अशी मागणी होत आहे.

परदेशातून आलेला काजू गोमंतकीय काजू म्हणून विकला जात असल्याने राज्याची बदनामी होते. परिणामी स्थानिक शेतकऱ्यांच्या काजूला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे परदेशातून आयात होणाऱ्या काजूवर भरीव आयात शुल्क लागू केल्यास या प्रकारांवर आळा बसेल, स्थानिक शेतकऱ्याचा मालाला योग्य भाव मिळेल.

-मिलिंद गाडगीळ, काजू उत्पादक शेतकरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com