Jet Patcher: दक्षिण गोव्यात आणखी दोन 'जेट पॅचर' मशीन

Jet Patcher Machine
Jet Patcher Machine Dainik Gomantak
Published on
Updated on

राज्यातील खड्डे बुजवण्यासाठी आणलेली जेट पॅचर मशिनचे (Jet Patcher Machine) काम सुरू झाले आहे. उत्तर गोव्यात (North Goa) एक मशीन कार्यरत आहे, तर दक्षिणेत आणखी दोन मशीन आणण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतला आहे. युद्ध पातळीवर खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून, ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे लक्ष्य खात्याने ठेवले आहे. त्यात उत्तरेच्या तुलनेत दक्षिण गोव्याचे (South Goa) क्षेत्रफळ जास्त असल्याने अतिरिक्त दोन मशीन आणली जाणार असल्याची माहिती खात्याच्या रस्ता विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाणंदीकर एक यांनी दै. 'गोमन्तक'ला दिली. (Two Jet Patcher Machine in South Goa)

Jet Patcher Machine
IAS Transfer: गोव्यातील चार 'आयएएस' अधिकऱ्यांची बदली

भाडेपत्तीवर खात्याकडून मशीन आणण्यात आली होती. उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यांसाठी प्रत्येकी कुठ्ठा ची एक मशीन देण्यात आले होते. परंतु, दक्षिणेत क्षेत्रफळ जास्त असल्याने एक मशीनकडून जलदगतीने काम पूर्ण होणार नाही. अनमोड घाटपासून दक्षिण गोव्यातील दक्षिणेची सीमा सुरू होते. त्यात काणकोण बाणास्तारी आणि कुठ्ठाळीपर्यंत ही असून यासाठी एक मशीन पुरणार नाही. त्यासाठी आणखी दोन मशीन मागवली आहेत.

रस्ता विभागाचे मुख्य अभियंता दिनेश गुप्ता म्हणाले, "उत्तर गोव्यातील जेट पॅचर मशिन सध्या ताळगाव मतदारसंघातील खड्डे बुजवण्याचे काम करत आहे. पुढील दोन दिवसांत येथील काम पूर्ण झाल्यानंतर इतर ठिकाणी हे जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने तयार केलेल्या खड्डयांच्या माहितीनुसार हे मशिन कार्यरत आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com