SpiceJet: आता स्‍पाईस जेट कंपनीनेही ‘दाबोळी’कडे फिरविली पाठ

SpiceJet: हिवाळी हंगामातील सर्व वाहतूक मोपावरून करण्याचा निर्णय
SpiceJet
SpiceJetDainik Gomantak

SpiceJet:

एअर इंडिया, ओमान एअरवेज आणि कतार एअरवेज या तीन आंतरराष्‍ट्रीय विमान कंपन्‍यांनी दाबोळी विमानतळाकडे पाठ फिरवलेली असतानाच मागील ऑक्‍टोबरपासून स्‍पाईस जेट या कंपनीनेही दाबोळी विमानतळावरील सर्व उड्डाणे बंद केली आहेत.

आता हिवाळी हंगामात आपली सर्व विमाने मोपावरून सुरू करण्याचा निर्णय स्पाईस जेट कंपनीने घेतल्याने दाबोळी विमानतळासंदर्भातील समस्‍या अधिकच वाढल्‍या आहेत.

दाबोळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक धनंजय राव यांना विचारले असता, ही बातमी नवीन नसून ती जुनीच आहे. गेल्या ऑक्‍टोबर महिन्‍यापासून स्‍पाईस जेटने विमाने दाबोळीवर उतरवण्‍याचे बंद केले आहे.

SpiceJet
Goa Accident Death: आधी दुचाकीवरून उसळली, नंतर तिला चारचाकीने चिरडले

दाबोळी विमानतळाचे अस्तित्व कायम राहणार, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह सर्व सत्ताधारी मंत्री सांगत असले तरी दाबोळी विमानतळाची अवस्था सध्या बिकट झाली असून या विमानतळावर फक्त विस्तारा आणि इंडिगो या दोन कंपन्यांचीच विमाने पूर्ण क्षमतेने चालतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्रासह राज्य सरकारचे मौन घातक

पुरेशा सुविधा आणि प्रोत्साहनाचा अभाव असल्यानेच कित्येक एअरलाईन्स दाबोळी विमानतळाकडे पाठ फिरवून मोपाकडे जात आहेत. यावर केंद्र सरकारने तोडगा काढण्याची गरज होती. पण केंद्र सरकार गप्प बसले आहे आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही त्याचे फारसे काही पडलेले नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com