Goa Accident Death: आधी दुचाकीवरून उसळली, नंतर तिला चारचाकीने चिरडले

Goa Accident Death: आंध्रच्या युवतीचा हणजुणेत हृदयद्रावक मृत्यू
Goa Road Accident
Goa Road AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident Death:

मोन्तेरोवाडा, हणजूण येथे ‘रेंट अ बाईक’ची संरक्षक कठड्याला जोरदार धडक बसल्यानंतर दुचाकीवर मागे बसलेली युवती उसळून रस्त्यावर आपटली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या कारने तब्बल 108 मीटर फरपटत नेल्याने आंध्र प्रदेशमधील टी. पुजिथा (25) ही युवती जागीच ठार झाली.

उपलब्ध माहितीनुसार, हा अपघात पहाटे पाचच्या सुमारास स्टार्को जंक्शनजवळ घडला. येथील एका गेस्ट हाऊसमध्ये पर्यटकांचा सहाजणांचा गट उतरला होता. या गटाने तीन ‘रेंट अ बाईक’ घेतल्या होत्या. टी. पुजिथा ही मित्र शिवम (वय २६, मूळ हरियाणा) याच्या दुचाकीवर मागे बसली होती.

वागातोर येथून हे पर्यटक पहाटे गेस्ट हाऊसच्या दिशेने परतत होते. यावेळी स्टार्को जंक्शनवर अरुंद रस्त्यामुळे शिवमचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीची धडक रस्त्यालगत असलेल्या घराच्या संरक्षक कठड्याला बसली.

Goa Road Accident
Goa Shack: शॅकसाठी टीसीपी परवान्याची गरज नसेल; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

यावेळी पुजिथा जोरात उसळून रस्त्यावर फेकली गेली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या कारच्या चाकाखाली ती चिरडली. यावेळी कारने पुजिथाला तब्बल 108 मीटर दूरपर्यंत फरपटत नेले. यातच तिचा मृत्यू झाला.

कारचालक महिलेला अटक

अपघातावेळी ही कार समरिन बावणी (सध्या रा. हणजूण, मूळ हैदराबाद) ही महिला चालवत होती. पोलिसांनी समरिनवर भादंसं कलम २७९, ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करून तिला अटक केली. या अपघातात पुजिथाचा मित्र शिवम किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com