होळीनिमित्त धावणार 3 खास रेल्वेगाड्या

मडगाव ते ठोकूर, ठोकूर ते पनवेल व पनवेल ते मडगाव दरम्यान तीन रेल्वे धावणार आहेत.
Railway
Railway Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: होळीनिमित्त रविवारी आणि सोमवारी खास रेल्वे धावणार आहेत. मडगाव ते ठोकूर, ठोकूर ते पनवेल व पनवेल ते मडगाव दरम्यान तीन रेल्वे धावणार आहेत.

Railway
अर्धफोंड पूल अडीच महिन्यांनंतर अवजड वाहनांसाठी खुला

रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक
गाडी क्रमांक- 01107 रविवारी (दि. 20 मार्च) मडगावहून पहाटे 5:10 वाजता सुटून त्याच दिवशी 11:30 वाजता ठोकूर येथे पोहोचेल. ही गाडी काणकोण (Canacona), कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा, होन्नावर, मुरडेश्वर, भटकल, मुकांबिका रोड, बैंदूर, कुंदापूर, बरकूर, उडुपी, मुल्की व सुरतकल येथे थांबेल.

Railway
अर्धफोंड पूल अडीच महिन्यांनंतर अवजड वाहनांसाठी खुला

गाडी क्रमांक- 01110 ही रविवारीच (दि. 20 मार्च) ठोकूरहून दुपारी 3:30 वाजता सुटून, पुढील दिवशी सकाळी 06:14 वाजता पनवेलला पोहोचणार आहे. ही रेल्वे (Railway) सुरतकल, मुल्की, उडुपी, बरकूर, कुंदापूर, मुकांबिका रोड, बैदूर, भटकल मोरडेश्वर, होन्नावर, कुमठा, गोकर्ण रोड, अंकोला, कारवार, काणकोण, मडगाव, करमली, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळुण, खेड व रोहा स्थानकावर थांबेल.

गाडी क्रमांक- 01109 ही सोमवारी (दि. 21 मार्च) पनवेलहून सकाळी 7:55 वाजता सुटून, त्याच दिवशी रात्री 21:30 वाजता मडगावला पोहोचणार आहे. या गाडीला 21 डबे असून, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वररोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी व करमली स्थानकावर थांबेल, अशी माहिती रेल्वे कडून मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com